मुंबई

निर्मळच्या आदिवासी तरुणाचा कारागृहात मृत्यू

CD

निर्मळच्या आदिवासी तरुणाचा कारागृहात मृत्यू
काँग्रेसची चौकशी करण्याची मागणी
विरार, ता. ३० (बातमीदार) : वसई पश्चिमेकडील निर्मळ येथे होळीच्या दिवशी गैरसमजातून दोन गटांत वाद झाला होता. याप्रकरणी कैलास लहांगे या आदिवासी तरुणावर वसई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याची व त्याच्या लहान भावाची ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली. कारागृहात असताना कैलासचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक आणि विविध संघटनांनी केलेली आहे.
निर्मळ येथे होळीच्या दिवशी दोन गटांत वाद झाला होता. त्यानंतर झालेल्या संशयास्पद मृत्यूमुळे त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची चौकशी करून सखोल तपास करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शशी सोनवणे यांनीही केली आहे. कैलास हा गरीब तरुण होता. तो सहसा कोणाच्याही वादात पडत नव्हता. होळीच्या दिवशी तो भांडण सोडवण्यासाठी त्याठिकाणी गेला होता; परंतु त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला तुरुंगात पाठवल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली येऊन कैलासवर गुन्हा दाखल केला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबरे यांनी केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! गृहनिर्माण सोसायटीतील मोकळ्या जागेवर सभासदांचाच हक्क; उच्च न्यायालयाचा बिल्डरला दणका; सभासदांना ‘या’ कार्यालयाकडे करावा लागेल अर्ज, वाचा...

आजचे राशिभविष्य - 01 मे 2026

Panchang 1 May 2026 : आजचे पंचांग! बुद्ध पौर्णिमा, शुभ मुहूर्त अन् राहु काळ जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 01 मे 2026

थंड थंडाई

SCROLL FOR NEXT