मुंबई

मोहने येथे नवीन बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी

CD

कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : उल्हास नदीवरील मोहने येथील जुना बंधाऱ्यालगत नवीन बंधारा बांधण्याचा प्रश्नमार्गी लागल्याने मी कल्याणकर सामाजिक संस्थेच्या मागणीला यश आले आहे. उल्हास नदीतील मोहने बंधारा येथून उल्हास नदीचे पाणी अडवून कल्याण-डोंबिवली पालिका, एमआयडीसी, स्टेम् आणि काही औद्योगिक कंपन्या पाणी उचलतात आणि पाणीपुरवठा करतात. या नवीन बंधाऱ्यासाठी सुमारे ७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचा आराखडा तयार केला असून अंतिम मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे.

मोहने बंधारा हा १९५० मध्ये ७३ वर्षांपूर्वी एनआरसी कंपनीने बांधला होता. सद्यस्थितीत त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. भविष्यात जर हा बंधारा फुटला, तर संपूर्ण जिल्ह्यात मोठे पाणीसंकट उभे राहू शकते, भविष्यातील संकट लक्षात घेता या बंधाऱ्याच्या काही मिटर अंतरावर एक नवीन बंधारा बांधण्यात यावा, ही नऊ वर्षांपासून मी कल्याणकर सामाजिक संस्था, उल्हास नदी बचावप्रेमीची मागणी होती. मी कल्याणकर सामाजिक संस्था अध्यक्ष माजी नगरसेवक नितिन निकम, सहकारी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी कळवा येथील पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन यांची मंगळवारी भेट घेतली. अनेक वर्षांपासून बंधाऱ्याजवळ साचलेला गाळ काढून नदीचे शुद्धीकरण करणार आहे. बंधाऱ्यासाठी व गाळ काढण्यासाठी लागणारा सर्व निधी हा पाटबंधारे विभाग उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली. प्रशासनाने दिलेल्या माहितीमुळे उल्हास नदी मोहने बंधाऱ्यालगत नवीन बंधारा बांधण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत आहे.

लवकरच बंधाऱ्यासाठी निविदा
मोहने उल्हास नदी जुन्या बंधाऱ्यालगत नवीन बंधारा बांधण्यात यावा, याबाबत पाठपुरावा करत होतो. त्याची प्रशासनाने दखल घेतली असून, लवकरच बंधाऱ्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. साधारण दोन वर्षांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

असा असणार बंधारा
उल्हास खोरे पाटबंधारे विभाग कळवा यांच्या अधिकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहने उल्हास नदी नवीन बंधारा बँरेज पद्धतीचा बांधण्यात येणार आहे. याची लांबी १७० मीटर लांब असेल. यामध्ये तीन दरवाजे व्हर्टिकल आणि बाकीच्या गाळ्यांनाही गेट असणार आहेत. पावसाळ्यात दरवाजे उघडल्यावर गाळ, जलपर्णी वगैरे वाहून जाईल. यामध्ये नवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. सुमारे ७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, आराखडा तयार आहे. अंतिम मंजुरीअंती लवकरात लवकर निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan lobby clash Video: मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

'मेल्यानंतर तरी मला न्याय द्या' अभिनेत्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत केले गंभीर आरोप, जीवन मृत्यूंशी देतेय झुंज

Latest Marathi News Updates : उर्दू माध्यमाच्या शाळेची दुरावस्था

R Madhavan Fitness Secrets: 55 व्या वर्षीही 'जोश' कायम! आर. माधवनचं तरुण दिसण्याचं हे आहे 'अस्सल' सिक्रेट

SCROLL FOR NEXT