अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य परिचारिकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे. परिचारिकांचा ठाम आग्रह आहे की, कोविड काळातील विशेष भत्ता शासनाने त्वरित द्यावा. तसेच सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यात याव्यात आणि त्यांना गणवेश भत्ता मिळावा. एनजीपीवाय (NGPY) अंतर्गत थकीत भत्ते अद्याप न मिळाल्यामुळेही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
या मागण्यांसोबतच त्यांनी कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या पदनिर्मितीला विरोध दर्शवत, नियमित भरतीची मागणी केली आहे. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आरोग्य परिचारिकांनी दिला.