मुंबई

एमआयडीसी स्फोटातील बाधितांना नुकसान भरपाई नाही

CD

नुकसानभरपाईसाठी भूमिपुत्रांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीतील बॉयलर स्फोटाच्या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता. या अपघातात १३ कामगारांचा मृत्यू झाला होता, तर ६७ लोक गंभीर जखमी झाले होते. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, यासाठी पंचनामे करण्यात आले होते; मात्र या घटनेला वर्ष झाले तरी अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसेच प्रोबेस कंपनीतील स्फोटाला नऊ वर्षे उलटली तरी नुकसानभरपाई मिळाली नाही. याच्या निषेधार्थ डोंबिवलीमधील सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या वतीने जाहीर बैठक घेत सरकारच्या या धोरणावर टीका करण्यात आली.

सोनारपाडा येथे शुक्रवारी (ता. २३) भूमिपुत्रांची एक बैठक पार पडली. या वेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, २७ गाव सर्व पक्षीय युवा समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, मधुकर माळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटाने एक वर्ष पूर्ण झाले आहे, मात्र यातील नुकसानग्रस्तांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. या दुर्घटनेत आजदे, सोनारपाडा व आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या घरांचे, दुकानांचे, गोदामांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने या ठिकाणचा पंचनामा केला होता, त्याला आता वर्ष उलटूनही स्फोटात बाधित झालेल्या स्थानिक नागरिकांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. त्या वेळी केलेल्या पंचनाम्यानुसार १३ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले, परंतु आतापर्यंत सरकारने कोणतीही भरपाई केलेली नाही.

दरम्यान, न्याय द्या, न्याय द्या, डोंबिवली एमआयडीसीमधील भूमिपुत्राला न्याय द्या, डोंबिवलीचे भोपाळ होऊ देऊ नका, धोकादायक कंपन्या स्थलांतर करा, स्फोटातील नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्या, आश्वासने नको, पंचनामे फक्त कागदावरच नको, नुकसानग्रस्तांना भरपाई लवकर द्या, असे बॅनर बाधितांनी हाती घेतले होते. या वेळी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी सरकारकडे लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, जेणेकरून बाधित कुटुंबांना दिलासा मिळू शकेल, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! गृहनिर्माण सोसायटीतील मोकळ्या जागेवर सभासदांचाच हक्क; उच्च न्यायालयाचा बिल्डरला दणका; सभासदांना ‘या’ कार्यालयाकडे करावा लागेल अर्ज, वाचा...

आजचे राशिभविष्य - 01 मे 2026

Panchang 1 May 2026 : आजचे पंचांग! बुद्ध पौर्णिमा, शुभ मुहूर्त अन् राहु काळ जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 01 मे 2026

थंड थंडाई

SCROLL FOR NEXT