मुंबई

पोलादपूरमध्ये ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्णविभाग सुरू

CD

पोलादपूरमध्ये ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू
पोलादपूर, ता. ३ (बातमीदार) ः ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथील बाह्यरुग्ण व दंतचिकित्सा विभागाचा लोकार्पण सोहळा नुकताच मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमासाठी माजी उपाध्यक्ष राजिप चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश अहिरे व इतर नगरसेवक पत्रकार उपस्थित होते. या बाह्यरुग्ण विभागामुळे पोलादपूरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचे नूतनीकरण हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात नव्याने दंतचिकित्सा विभाग सुरू करण्यात आले असून, दर शनिवारी डॉ. ठोंबरे यांच्या माध्यमातून रुग्णसेवा उपलब्ध होणार आहे. तरी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारिवर्गाने केली आहे. या बाह्यरुग्णालयाचे उद्‌घाटन मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. तसेच या ग्रामीण रुग्णालयाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्‍यांनी यावेळी जाहीर केले. तर राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी नगर पंचायत पदाधिकाऱ्यांना ग्रामीण रुग्णालयाकरिता सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महिला नगरसेविका व नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांनी जास्तीत जास्‍त प्रसूती येथे व्हाव्यात त्याकरिता पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ‍ वैद्यकीय अधिकारी मिळवा, यासाठी यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तालुकाप्रमुख नीलेश अहिरे यांनी वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे ४३ इंची टीव्ही भेट म्हणून दिला. या टीव्हीच्या माध्यमातून रुग्णांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच लोकशिक्षण व इतर आयईसी अभ्यासवर्ग घेण्याचा मानस वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारताची दहशत! पाकिस्तानी खेळाडू म्हणतो आमच्याविरुद्ध खेळू नका, भीती वाटते....

War 2 : वॉर 2 चित्रपटाच्या रिलीज दिवशीच डाउनलोड लिंक व्हायरल, 'या' वेबसाइटवर फुल मूवी लिक...

Independence Day Eco-Friendly Celebration: इकोफ्रेंडली स्वातंत्र्यदिन साजरा करायचा आहे? करा असं नियोजन

Independence Day speech: स्वातंत्र्यदिनाचे भाषण खास बनवा, 'या' टिप्स लक्षात ठेवा

Yeola News : जिल्हा बँकेचे कर्ज १०० टक्के माफ करा; १५ ऑगस्टला ५४ हजार शेतकऱ्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT