
‘वॉर 2’ चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी पायरेटेड वेबसाइट्सवर लीक झाला.
हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांच्या अभिनयाने चित्रपटाला प्रचंड चर्चा मिळाली.
यशराज फिल्म्सने पायरसीविरुद्ध सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
War 2 Movie Link Leak : बहुप्रतिक्षित बॉलिवूड चित्रपट ‘वॉर 2’ आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याचवेळी पायरसीच्या ब्लॅक मार्केटमध्ये त्याची चर्चा सुरू झाली आहे. हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी काही अवैध वेबसाइट्सवर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चित्रपटाच्या डाउनलोड लिंक्स NetMirror, फिल्मीझिला, मूव्हीरुल्स आणि मूव्हीजदा, FMovies, यांसारख्या वेबसाइटवर व्हायरल होत असून, चित्रपट निर्मात्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.