येवला: नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्ह्यातील ५४ हजार शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे थकीत कर्ज १०० टक्के माफ करावे, या मागणीसाठी येथे १५ ऑगस्टला जाहीर घोषणा करण्यात येणार आहे. या वेळी जिल्ह्यातील शेतकरी कर्ज न फेडण्याची आणि आत्महत्या न करण्याची सार्वजनिक शपथ घेणार आहेत.