मुंबई

बेकायदा भोंग्यांवर कारवाई करा : सोमय्या

CD

बेकायदा भोंग्यांवर
कारवाई करा : सोमय्या
पनवेल, ता. २१ (बातमीदार) : धर्माच्या नावावर कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचे पालन अनिवार्य आहे, असे ठाम मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले. सोमवारी त्यांनी पनवेल दौरा केला. शहरातील अनधिकृत भोंग्यांमुळे वाढणारे ध्वनिप्रदूषण आणि त्यामुळे नागरिकांत निर्माण झालेली नाराजी लक्षात घेत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘भोंगामुक्त’ मोहिमेला गती देण्यासाठी सोमय्या यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत पनवेल व परिसरातील पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या. खारघर, कळंबोली आणि तळोजा पोलिस ठाण्यांत त्यांनी अनुक्रमे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कांबळे, राजेंद्र कोते आणि प्रवीण भगत यांच्याशी चर्चा केली. शहरातील बेकायदा भोंगे तातडीने हटवावेत, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला पोलिस प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील आठ दिवसांत कारवाई करून बेकायदा भोंगे बंद करण्याचे आश्वासन दिले. सोमय्या यांनी या वेळी सांगितले की, धार्मिक भावना जपताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. या दौऱ्यात भाजपचे अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी लग्नाची पत्रिका द्यायला गेलो अन" सचिन पिळगावकरांनी सांगितला संजीव कुमारांचा अखेरचा क्षण; म्हणाले..

Mumbai : १० वर्षांच्या मुलावर निर्जनस्थळी अत्याचार, आरोपींमध्ये दोघे अल्पवयीन तर एक १८ वर्षांचा

Champions League T20: चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२०चे पुनरुज्जीवन ? आयसीसीकडून सभेत चर्चा; भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा

Satara Crime: घरफोडीप्रकरणी महिलेला अटक; शाहूपुरी पोलिसांकडून दहा तोळ्यांचे दागिने हस्तगत

Chess Tournament: बुद्धीबळाचा विश्‍वकरंडक भारतामध्ये; २३ वर्षांनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरमध्ये आयोजन

SCROLL FOR NEXT