
नवी दिल्ली : भारतामध्ये तब्बल २३ वर्षांनंतर बुद्धीबळ विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्षी (२०२५) ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर यादरम्यान भारतामध्ये बुद्धीबळ विश्वकरंडकाची रंगत पाहायला मिळणार आहे, अशी माहिती फिडे या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेकडून सोमवारी देण्यात आली.