Major Breakthrough in Burglary: पोलिसांनी संबंधित महिलेला बोलावून चौकशी केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. त्या वेळी संशयित महिलेने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून रोख रक्कम व चोरीला गेलेले दागिने हस्तगत केले आहेत.
Shahupuri Police team with the recovered gold ornaments after arresting the woman involved in house burglary.Sakal
सातारा: गडकर आळीमध्ये घरफोडीत रोख रक्कम व सुमारे दहा तोळे दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी संबंधित घरातील भाडेकरू महिलेला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. निकिता राहुल येळे-बैलकर (वय २२, रा. सोमवार पेठ) असे त्या महिलेचे नाव आहे.