डॉ. श्रीराम कुलकर्णी यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : रुग्णसेवेबरोबर ज्ञानदान, सामाजिक कार्यात कार्यरत असलेले डोंबिवलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम कुलकर्णी (वय ८९) यांचे सोमवारी (ता. २१) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. अमित कुलकर्णी, सून डॉ. उज्ज्वला, विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भारत-पाकिस्तान युद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी त्यांनी काम केले होते. किल्लारी, भूज येथील भूकंपावेळी त्यांनी मोफत वैद्यकीय सेवा दिली. सण, उत्सवाच्या काळात परिसरातील लोकांनी एकत्र यावे, या विचारातून डॉ. कुलकर्णी यांनी रामनगर गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. पसायदानाचा ते अखंड जप करीत होते.