वीजचोरी प्रकरणात तिघांवर कारवाई
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी प्रकरणात महावितरणने जुईनगरमधील एका ग्राहकावर वाशी पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पनवेल ग्रामीण भागातही दोन ठिकाणी कारवाई केली आहे.
जुईनगर सेक्टर २३ येथे राहणाऱ्या संजीवनी घरटकर यांच्या घरातील मीटर संथगतीने सुरू असल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आले होते.
तसेच सीलमध्ये छेडछाड झाल्याचे निदर्शनास आले. तपासणीअंती मीटरच्या सर्किटमध्ये फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे उघडकीस आले. या तपासणीदरम्यान घरटकर यांच्याकडून ४०३ युनिटचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले. महावितरण कंपनीला २२,४४३ रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे आढळून आले. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पनवेल ग्रामीण विभागातही दोन वीज चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, त्यामध्ये अनुक्रमे १८ हजार दोनशे तर पाच हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.