विमान प्रवासात अडथळ्यांची शर्यत
प्रस्तावित जोड प्रकल्पांची कामे संथ गतीने, प्रवाशांचा मार्ग खडतर
पनवेल ता. २८ (बातमीदार)ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ८ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. त्या अनुषंगाने प्रस्तावित रस्ते जोडणीचे प्रकल्प सुरू आहेत, पण बहुतांश कामे संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांचा मार्ग खडतरच असणार आहे.
मुंबईकरांची वाढती गरज भागवण्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी सातत्याने होती. त्यामुळे १९९० च्या दशकापासून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आता विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने मेट्रो तसेच जलमार्गाने जोडले जाणार आहे, परंतु जलमार्गाच्या कामाला वेळ लागणार आहे. रस्ते मार्गे विमानतळावर पोहोचण्यासाठी अटल सेतू वगळता इतर जलद मार्ग नसल्याने प्रवाशांना गैरसोईंना सामोरे जावे लागणार आहे.
----------------------------------------
महामार्गावरील उड्डाणपूल
पनवेल-सायन महामार्गाची रुंदीकरण वाहनांची संख्या पाहता येथे वाहतूक कोंडी होत आहे. रोडपाली येथील खाडीवर नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असले तरी त्याला वेळ लागणार असल्याने सध्या वाहतूक मंदावलेली आहे.
--------------------------------------
कळंबोली जंक्शन विस्तारीकरण
कळंबोली सर्कलचे ७०० कोटी खर्च करून विस्तारीकरणाचे काम खाते घेण्यात आलेले आहे, पण यासाठीचा कालावधी मोठा आहे. त्यामुळे विमानतळ सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.
---------------------------------
मेट्रो, जलवाहतुकीत दिरंगाई
विमानतळाकडे येण्यासाठी ठाणेपासून इलेव्हेटेड रोडचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर वॉटर टॅक्सीसाठी जेट्टी बांधावी लागणार आहे. कोस्टल रोडचे काम अर्धवट असून, मुंबई, नवी मुंबई मेट्रोसेवा सुरू होण्यासाठी आणखी काही वर्षे लागणार आहेत.
--------------------------
पनवेल-मुंब्रावर वाहनांच्या रांगा
उत्तरेकडील राज्यातून जेएनपीएकडे येणारे ट्रक, ट्रेलर, टँकर, पनवेल-मुंब्रा महामार्गावरून येतात. या महामार्गावर वाहनांची वर्दळीमुळे डोंबिवली, कल्याण, भिवंडी, ठाणे परिसरातून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
--------------------------------
खड्ड्यांमुळे कसरत
पुणे, रायगड जिल्ह्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येणाऱ्या प्रवाशांना खड्ड्यातून वाट काढावी लागणार आहे. मुंबई-पुणे महामार्गाकडून येणाऱ्या मार्गिकांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पळस्पे फाट्यावर मार्ग काढताना नाकीनऊ येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.