मुंबई

नवी मुंबई विमानतळ रस्त्यावर पहिला अपघात

CD

नवी मुंबई विमानतळ रस्त्यावर पहिला अपघात
तीन वाहनांची धडक, जीवितहानी नाही
पनवेल, ता. १० (वार्ताहर) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या पनवेल ते उलवे मार्गावर आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या मार्गावरील वाघिवली गावाजवळील वळणावर हा अपघात घडला. मार्गावर रस्ता दुभाजक किंवा व्हाईट पट्टे नसल्याने दोन कार समोरासमोर आल्याने त्या एकमेकांवर जोरदार धडकल्या. याच वेळी पाठीमागून येणारा टेम्पोदेखील या कारवर धडकला आणि पलटी झाला. त्यामुळे टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच उलवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. रस्ता दुभाजक आणि पट्ट्यांच्या अभावामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न येणे हे या अपघाताचे कारण ठरले, तसेच वाघिवली गावाजवळच्या वळणावर वारंवार अपघात होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

Uddhav Thackeray : सरकारचे ‘पॅकेज’ म्हणजे सर्वांत मोठी थाप; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक लाखाची मदत द्या

Pimpri News : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT