मुंबई

जीवनदीप महाविद्यालयात ''देवाभाऊ व्हिजन रिसर्च प्रकल्प''

CD

जीवनदीप महाविद्यालयात ''देवाभाऊ व्हिजन रिसर्च प्रकल्प''
७५ दिवसांत सहा हजार विद्यार्थी, १५०० वाहनचालक, १५०० कामगारांची होणार नेत्र तपासणी

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : मानवाच्या ज्ञानेंद्रियांपैकी अत्यंत महत्त्वाचा असलेला डोळा या ज्ञानेंद्रियाच्या आरोग्याकडे ग्रामीण भागात अनेकदा दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे मोतीबिंदू आणि इतर डोळ्यांचे आजार वाढतात. याच पार्श्वभूमीवर, जागतिक दृष्टी दिनाचे औचित्य साधून आज गुरुवारी (ता. ९) जीवनदीप महाविद्यालय, गोवेली येथे भव्य नेत्र तपासणी व उपचार महाशिबिराचा आणि ''देवाभाऊ व्हिजन रिसर्च प्रोजेक्ट'' सुरू करण्यात आला. व्हिजन फ्रेंड साकिब गोरे, जीवनदीप शैक्षणिक संस्था आणि नेत्रम केअर गुड व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. गोरगरीब, कष्टकरी, चालक, हमाल यांसारख्या लोकांच्या डोळ्यांची मोफत काळजी घेत, त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून तसेच मोफत चष्मे वाटप करून अविरत सेवा करणारे ''दृष्टी मित्र'' साकिब गोरे यांच्या संकल्पनेतून या रिसर्च प्रोजेक्टची सुरुवात जीवनदीप महाविद्यालय, गोवेली येथून झाली आहे. परिसरातील नागरिकांसाठी हे शिबिर पुढील दीड महिना महाविद्यालय परिसरात सुरू राहणार आहे. यावेळी आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, सुलभा गायकवाड, कुमार आयलानी, आयुष्यमान भारतचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, ठाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, अशोक फर्डे, प्रसन्ना देशमुख, अशोक लोणे, उपेंद्र गायकवाड, प्रकाश गाडे, डॉ. दीपलक्ष्मी मेश्राम, डॉ. आशा गुंजाळ आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

''दृष्टी मित्र'' साकीब गोरे यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुढील ७५ दिवसांत जीवनदीप महाविद्यालयातील ६ हजार विद्यार्थी, भिवंडीतील १५०० वाहन चालक आणि १५०० पॉवरलूममधील कामगार यांची नेत्र तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, ३ हजार जणांवर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमानंतर जीवनदीप महाविद्यालय ''दृष्टी दोष रहित महाविद्यालय'' होणार आहे.

आमदार कथोरे यांनी ''दृष्टी मित्र'' साकीब गोरे यांच्या कार्याचे कौतुक केले आणि सांगितले की, दृष्टी दोष कोणालाही राहू नये यासाठी गोरे यांचे काम उल्लेखनीय असून, त्यांनी आपले कार्य सातसमुद्रापार नेले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुख शेट्ये यांनी ''कुणाचीही आर्थिक मदत न घेता केवळ आरोग्यविषयक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने दृष्टी देण्याचे काम करणारे दृष्टी मित्र गोरे यांचे कार्य इतरांपेक्षा वेगळे'' असल्याचे नमूद केले.

१६ देशांतील संस्था
''दृष्टी मित्र'' साकीब गोरे यांनी सांगितले की, विद्यार्थी, वाहन चालक आणि कामगार यांचा दृष्टी दोष घालवणे हा या प्रोजेक्टचा मुख्य हेतू आहे. ते गेल्या ३४ वर्षांपासून नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे काम करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी २९ लाख जणांची नेत्र तपासणी केली असून, १८ लाख जणांना चष्मे वाटप केले आहे आणि ६५ हजार जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आहे. या प्रोजेक्टमध्ये जर्मनीचे ''गुड व्हीजन'', लंडनचे ''आयएपीबी'', ''व्हीजन २०-२० इंडिया'' यांसारख्या १६ देशांतील संस्था एकत्रितपणे काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namibia historic win Video : नामिबियाच्या धडाकेबाज बॅट्समनने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मारला कडक चौकार अन् घडवला इतिहास!

Uddhav Thackeray : सरकारचे ‘पॅकेज’ म्हणजे सर्वांत मोठी थाप; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक लाखाची मदत द्या

Pimpri News : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार

Namibia beat South Africa: आरारारारा...खतरनाक! नामिबियाने चक्क दक्षिण आफ्रिकेला केलं पराभूत; क्रिकेटमध्ये घडवला नवा इतिहास

Palghar News : पालघरच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झोलंमझाल; मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT