मुंबई

सफाळेत रुग्णांना चादरीत उचलून नेण्याची वेळ!

CD

रुग्णाला चादरीतून उचलून नेण्याची वेळ!
सफाळे पश्चिमेकडील टेपाचा पाडा येथील भयाण वास्तव उघड
बोईसर, ता. ११ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमेकडील टेपाचा पाडा (पाटीलनगर) येथे रस्त्याच्या मूलभूत सुविधेअभावी नागरिकांचे हाल होत असल्याचे धक्कादायक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. रस्ता नसल्यामुळे एका आजारी वयोवृद्ध महिलेला दीड किलोमीटरपर्यंत चादरीच्या डोलीतून (झोळीत) घेऊन कुटुंबाला पायपीट करावी लागली. हा प्रसंग संपूर्ण परिसरासाठी वेदनादायी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक ठरला आहे.
टेपाचा पाडा येथील नागरिक आणि शेतकऱ्यांना रस्त्याअभावी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. पूर्वी रेल्वे पुलाखालचा ९० फूट रुंदीचा रस्ता शेती आणि नागरिकांच्या वापरासाठी खुला होता; मात्र रेल्वे विभागाने नवीन मार्गिका टाकून भराव केल्याने हा जुना पारंपरिक मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकत नाहीत. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना चादरीतून उचलून न्यावे लागत आहे. पारंपरिक शेतीमार्ग त्वरित मोकळा करण्यात यावा आणि टेपाचा पाडा येथील नागरिकांना दिलासा मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

व्यक्तिगत अडथळ्यांचा आरोप
गावकऱ्यांनी उंबरपाडा सफाळे ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज दिला असून, एका व्यक्तीने रस्त्याच्या मध्यभागी भराव करून अडथळा निर्माण केल्याचा आरोप केला आहे. हा रस्ता तातडीने मोकळा करावा आणि अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, खासदार आणि आमदारांना याबाबत लेखी अर्ज सादर केला आहे. प्रशासन आणि रेल्वे विभागाने हा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर रस्त्यासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३५ हजार शिक्षकांचा कापला जाणार एक दिवसाचा पगार; आंदोलनावेळी बंद राहिल्या राज्यातील २४ हजार शाळा; आता ९ अन्‌ १२ तारखेला नागपूरमध्ये आंदोलन

Dhule News : उभा केलेला ट्रॅक्टर उतारावरून मागे सरकला अन् विहिरीत कोसळला; ३ वर्षीय दोन मुली बुडाल्या, एकीला वाचवलं

Khandala : सातारा-पुणे मार्गावर भरधाव ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रकचालक फरार

Indigo Crisis : ६१० कोटी दिले रिफंड, ३ हजार बॅग्जही पोहोचवल्या; आज इंडिगोच्या १६५० विमानांचं उड्डाण

Mangalwedha News : खरीप ते रब्बी; प्रत्येक हंगामात दुबार पेरणी; शेतकऱ्यांच्या व्यथेला शासनानं कधी दाद द्यायची!

SCROLL FOR NEXT