मुंबई

परदेशातील पक्षी पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर.

CD

परदेशी पक्ष्यांचा पालघरमध्ये मुक्काम
पोषक वातावरण, मुबलक अन्नामुळे हजारो किलोमीटरचे उड्डाण
तारापूर, ता. ३ (बातमीदार) ः थंडीच्या दिवसांत हजारो किलोमीटरचे उड्डाण घेत परदेशातील पक्षी पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यासोबत खाजण आणि विविध तलावांच्या ठिकाणी येतात. यंदाही अनेक पक्षी दाखल झाले असल्याने पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.
पालघर जिल्ह्यातील चिंचणी, डहाणू, तलासरी तालुक्यातील समुद्रकिनारी भाग, खाजण तसेच तलाव ठिकाणी परदेशी पक्षी दिसत आहेत. जिल्ह्यातील किनारी भाग, खाड्या व खारफुटीचे जंगल, मोकळी दलदलीची क्षेत्रे पक्ष्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे सायबेरिया, रशिया, मंगोलिया, मध्य आशिया, युरोपातील काही थंड प्रदेशातून ग्रेटर फ्लेमिंगो, लेसर फ्लेमिंगो, सँडपायपर प्लोव्हर, नॉर्दर्न पिंटेल, कॉमन टील, ऑस्प्रे (समुद्री गरुड), व्हिस्लिंग डक असे पक्षी पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी दाखल झाली आहेत.
--------------------------
विनाथांबा प्रवास
- थंड देशांमध्ये हिवाळ्यात तापमान खूप खाली जाते. त्यामुळे उबदार हवामानासाठी अन्नाची उपलब्धता मिळावी म्हणून सुरक्षित अधिवास शोधण्यासाठी परदेशी पक्षी भारतात स्थलांतर करतात. भारतातील किनारी व दलदलीचे भाग त्यांच्यासाठी अनुकूल ठरतात.
- पक्ष्यांचे पाच हजार किलोमीटरवरून उड्डाण करणारे पक्षी, काही स्थलांतरित पक्षी तब्बल चार ते पाच हजार किलोमीटर अंतर पार करून भारतात येतात. फ्लेमिंगो, सँडपायपर आणि काही बदकांच्या प्रजाती विनाथांबा इतका मोठा प्रवास करीत असल्याचे पक्षीनिरीक्षक भावेश बाबरे यांनी सांगितले.
-----------------------------
पालघर जिल्ह्याचा किनारी भाग जैवविविधतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन निसर्गासाठी सकारात्मक लक्षण आहे.
- भावेश बाबरे, पक्षी निरीक्षक, चिंचणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP–AIMIM Alliance: ‘बटेंगे तो कटेंगे’सारखे घोषवाक्य देणाऱ्या भाजपची AIMIM सोबत युती, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट!

शिक्षणाधिकाऱ्यांचाच अभ्यास कच्चा, आदेशाचा चुकीचा अर्थ काढला; राज्यात शिक्षकांना दिल्या कुत्रे मोजण्याच्या सूचना

T20 World Cup 2026 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; रोहित शर्माचा मित्र कर्णधार, एकाच डावात १९ सिक्स मारणाराही फलंदाजही परतला

Asaduddin Owaisi:‘१५ मिनिटां’चा इतिहास आहे, १५ तारखेला पुन्हा इतिहास घडवा: खासदार असदुद्दीन ओवेसी; राजकारणात नवा अध्याय लिहा!

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती, कमळाला हाताचा आधार; शिवसेना शिंदे गट विरोधी बाकावर

SCROLL FOR NEXT