मुंबई

तर आम्ही वेगळा विचार करू

CD

...तर आम्ही वेगळा विचार करू
भाजप आमदार संजय केळकर यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : गेल्या ४० वर्षांमध्ये असे यश भाजपला मिळाले नव्हते. इतका मतटक्का वाढला आहे, त्यामुळे भविष्यात भाजप मोठी भरारी घेईल. आम्ही एकत्र लढलोय, त्यामुळे एकत्रच राहू. तरी अंकुश ठेवणारी एक शक्ती लागते. तेव्हा वेळ पडली तर आम्ही वेगळा विचार करू, असा सूचक इशारा भाजप आमदार संजय केळकर यांनी दिला. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविले. त्याबद्दल माहिती देण्यासाठी शनिवारी वर्तकनगर येथील भाजप विभागीय कार्यालयात सर्व विजयी नगरसेवकांसमवेत पत्रकार परिषद झाली. त्या वेळी त्यांनी हा इशारा दिला.
शिवसेनेसोबतच्या युतीमध्ये अवघ्या ३९ जागा लढवून २८ जागांवर निर्विवाद यश मिळवत भाजपने ठाण्यात ७५ टक्के इतका उत्तम स्ट्राइक रेट राखला. तसेच दोन राजकीय पक्षांचे अध्यक्ष पराभूत करून सभागृहात विरोधक दिसणार की नाहीत, अशी परिस्थिती निर्माण केली. महाराष्ट्रभर अशी त्सुनामी आली असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. ठाण्यात युतीमध्ये भाजपच्या वाट्याला कमी जागा आल्या तरीही ७५ टक्के स्ट्राइक रेट मिळवला.

एमएमआर रिजनमध्येही भाजप क्रमांक एक
केवळ धनिकच निवडून येतात, असे नाही तर कामाच्या दृष्टीने गरीब कार्यकर्त्यालाही या वेळी संधी मिळाली. हा लोकशाहीच्या दृष्टीने मोठा संदेश आहे. ठाण्यात आम्ही १०० पार गेलो आहोत. गेल्या ४० वर्षांमध्ये असे यश मिळाले नव्हते. ठाण्यासह एमएमआर रिजनमध्येही भाजप क्रमांक एकवर आहे. अनेक बंडखोरांना यश मिळाले नाही. कारण मतदार सुज्ञ आहेत. ठाण्यात मत टक्का (व्होट शेअर) वाढला आहे. तेव्हा भविष्यात भाजप मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त करून आमची युती असली तरी योग्य ते काम होईल, यासाठी आग्रही राहू, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

संघटन कौशल्याचे यश
ठाण्यातील १७ प्रभागांत ३९ ठिकाणी निवडणूक लढलो. ठाण्याच्या प्रत्येक विधानसभेत कमळ फुलले आहे. सात जागा मुंब्य्रातील, तीन जागा राबोडी तर, एक जागा कळवा डोंगरपट्ट्यातील होत्या. पाच मंडळ अध्यक्ष, तीन माजी मंडळ अध्यक्ष अशा आठ जणांना तिकीट दिले होते. विशाल वाघसारख्या कार्यकर्त्याच्या पत्नीला पक्षाने उमेदवारी दिली. २०१७ मध्ये आमच्या २३ जागा होत्या, त्यामध्ये पाच जागा भाजपने नव्याने मिळवल्या आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी दिली. हे संघटन कौशल्याचे यश असल्याचे स्पष्ट करून भाजपच्या निर्धारनाम्यात दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करू, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

शिळ ते वडवली... भाजप वाढवली ः संदीप लेले
ठाणे महापालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी, चप्पा चप्पा भाजप... चांद्यापासून बांद्यापर्यंत हे ओवळा एक नंबर ते शिळ असे दुसऱ्या टोकापर्यंत भाजपने ठाण्यात साध्य करून दाखवल्याचे म्हटले आहे. ठाण्यात भाजपचे १२ उमेदवार प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात होते. तर उर्वरित १६ रिपिटेड होते. कोपरी-पाचपाखाडीत विधानसभा क्षेत्रात चार, ठाणे शहर विधानसभेत १८ होते ते २१ केले. ओवळा-माजिवड्यात एकच होता आता चार झाले. कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात शून्य होते तिथे आता शिळ प्रभाग २९ मध्ये भाजपचा एक निवडून आला आहे. माझी जिल्हाध्यक्षपदाची ही तिसरी टर्म आहे. पहिल्यावेळी चारनंतर आठ झाले. २०१७ मध्ये आठचे २३ झाले आणि आता २८ झाले. अशा प्रकारे शिळ ते वडवली... भाजप वाढवली, असे संदीप लेले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCA strict action against Indigo : ‘डीजीसीए’चा ‘इंडिगो’ला मोठा दणका!, हजारो उड्डाणे रद्द प्रकरणी केली कडक कारवाई

Ration Card Limit: गरजूंसाठी आनंदाची बातमी! रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा वाढवली; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune Traffic: सोमवारी पुण्यातले महत्त्वाचे रस्ते बंद! शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; 'हे' मार्ग टाळा अन् पर्यायी मार्ग बघा

IND U19 VS BAN U19: वैभव सूर्यवंशीने टीपला सूर्या दादासारखा कॅच; बांगलादेशच्या हातून खेचली मॅच, भारताचा रोमहर्षक विजय

Beed News : बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला; वरिष्ठाच्या छळासंबंधित "लिहिलेली नोट" गाडीत सापडली!

SCROLL FOR NEXT