तिरुपती इंडस्ट्रीज इमारतीत भीषण आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ठाण्यातील पोखरण रोड येथील तिरुपती इंडस्ट्रीज या इमारतीमधील एका ऑफिसमध्ये मंगळवारी (ता.२७) भीषण आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, ऑफिस संपूर्ण जळून खाक झाले आहे, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
तिरुपती इंडस्ट्रीज या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जे. बी. एंटरप्राईझेस इंडस्ट्रीअल ऑईल ट्रेडिंग कंपनीचे ऑफिस आहे. तसेच त्या ऑफिसचे मालक अमर निंबाळकर हे आहेत. मंगळवारी पहाटे या ऑफिसला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी वर्तकनगर पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन, महावितरण या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तर ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरू केले. त्यानंतर ती आग जवळपास एक तासांनी पूर्णपणे नियंत्रणात त्या जवानांना यश आले. या आगीत, कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, ते ऑफिस संपूर्णपणे जळून खाक झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.