पनवेल, ता. २८ (वार्ताहर) : पनवेल न्यायालयाच्या न्यायदान कक्षामध्ये एका व्यक्तीने फिनेलसदृश द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २८) सकाळी घडली. राजेश मिऱ्या परदेशी (वय ५१) असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा नातेवाइकांसोबत दिवाणी न्यायालयात दावा सुरू होता. या संपूर्ण प्रक्रियेला त्रासल्यामुळे त्यांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राजेश परदेशी हे करंजाडे येथे राहण्यास असून, त्यांचा नातेवाइकांसोबत जमिनीसंदर्भात वाद सुरू आहे. यासंदर्भात २०२२ पासून त्यांचे पनवेल येथील दिवाणी न्यायालयात दावादेखील सुरू होता. या सर्व प्रकारामुळे राजेश त्रस्त झाले होते. बुधवारी सुनावणी असल्याने ते पनवेल दिवाणी न्यायालयात गेले होते. या वेळी त्यांनी आपल्यासोबत एका बाटलीमधून आणलेले फिनेलसदृश द्रव्य न्यायदान कक्षामध्ये प्राशन केले. काही वेळानंतर त्यांना त्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांना तत्काळ पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश परदेशी यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.