मुंबई

ओला सुका कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकणाऱ्यांवर गुन्हे दाखल

CD

कचरा फेकणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
१३ जणांना समज, दोन जणांवर गुन्हे दाखल

कल्याण, ता. ३ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वच्छता विभागाने कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर पालिकेने पोलिसांच्या मदतीने फौजदारी कारवाई सुरू केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कल्याण पूर्वेतील विनायक कॉलनी परिसरात पालिकेची घंटागाडी नियमित येत असूनही काही नागरिक ओला व सुका कचरा एकत्रित करून सार्वजनिक ठिकाणी फेकत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले होते. याची गंभीर दखल घेत उपायुक्त रामदास कोकरे यांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून प्रत्यक्ष कारवाईचे आदेश दिले.

कारवाईचा तपशील
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३ व्यक्तींना जागीच समजपत्रे देऊन ताकीद देण्यात आली. कचरा फेकणाऱ्या काही नागरिकांविरुद्ध अजामीनपात्र नोंदी करण्यात आल्या आहेत. गंभीर स्वरूप असलेल्या दोन प्रकरणांमध्ये कोळसेवाडी पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रशासनाचा कडक इशारा
स्वच्छ भारत अभियान आणि महापालिकेच्या नियमांनुसार, प्रत्येक नागरिकाने ओला व सुका कचरा वेगळा करून तो केवळ घंटागाडीतच देणे बंधनकारक आहे. वारंवार जनजागृती करूनही जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकतात किंवा कचरा जाळून प्रदूषण करतात, त्यांच्यावर यापुढे अधिक कठोर फौजदारी कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे पालिकेच्या स्वच्छता विभागाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

१२ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष! विद्यापीठाने ५ दिवसांत लावले १७ अभ्यासक्रमांचे निकाल; उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क, वाचा...

Panchang 30 April 2026 : आजचे पंचांग! नृसिंह जयंती, शुभ मुहूर्त आणि राहु काळ जाणून घ्या

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकावर पुन्हा लागणार बोली; बेस प्राईज ५ लाख, BCCI ची परवानगी, LSG ने एकही मॅच नाही खेळवली

SCROLL FOR NEXT