मुंबई

पोयनाडच्या वेशीला डंपिंग ग्राऊंडचा विळखा, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

CD

पोयनाडच्या वेशीला डंपिंग ग्राऊंडचा विळखा
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
पोयनाड, ता. १४ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील सर्वात गजबजलेली आणि सुप्रसिद्ध बाजारपेठ अशी ओळख असलेल्या पोयनाडला सध्या डंपिंग ग्राऊंडचा विळखा बसला आहे. पोयनाडच्या वेशीवरच नवेनगर फाट्याजवळ बेकायदेशीरपणे उभारलेल्या डंपिंग ग्राउंडमुळे स्थानिकांचे जगणे असह्य झाले असून, येथील धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.
अलिबाग तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने पोयनाड येथे मिरची-मसाला व अन्य गरजेच्या आणि जीवनावश्यक वस्तू होलसेल दरात खरेदी करण्यासाठी येतात. परंतु, पोयनाड बाजारपेठेत जाताना नवेनगर फाट्याजवळच हे डंपिंग ग्राऊंड आहे. येथे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधीमुळे येथून नाकाला रुमाल लावूनच प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तसेच येथील कचरा पेटवला जात असून त्यातील धुरामुळे नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या डंपिंग ग्राउंडच्या धुराचा त्रास नवेनगर फाटा, स्वयंभू गृहसंकुल, बांधण नाका ते थेट अशोका लाॅन्सपर्यंत होतो. या डंपिंग ग्राउंडच्या शेजारीच एक रूग्णालय असून प्रसूतिगह देखील आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंग्यूसारख्या साथींचा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष
कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा आणि बेकायदेशीर डंपिंगमुळे समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. अनेक वेळा तोंडी तसेच लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांनी म्हंटले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
पोयनाडमधील नागरिक आणि खेळाडूंनी आता या अवैध डंपिंग ग्राउंडविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून हे डंपिंग ग्राउंड हटवावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. पोयनाडसारख्या बाजारपेठेच्या वेशीची अशी दुर्दशा होत असताना प्रशासनाचे डोळे अजूनही उघडणार की नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

अवैध डंपिंग ग्राउंडच्या जवळच झुंझार क्रिकेट मैदान आहे. तर दुसऱ्या बाजूला रूग्णालय आहे. दुर्गंधीमुळे खेळाडूंचे आरोग्य धोक्यात आले असून, तर धुरामुळे रूग्णांना मोठा त्रास होतो. अशा, अवैध डंपिंग ग्राउंडचे स्थलांतर होणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे.
- ॲड. पंकज पंडित, सामाजिक कार्यकर्ते

डंपिंग ग्राउंडमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथे खेळाडू, रूग्ण यांना याचा मोठा त्रास होतो. या डंपिंग ग्राउंडच्या एका बाजूला एक मैदान आहे. तेथे मोठे विविध कार्यक्रम होतात. येथून जाणाऱ्या येणाऱ्यांना दुर्गंधी आणि धूर याचा मोठा सामना करावा लागतो आहे. या अवैध डंपिंग ग्राउंड समोरील मोठ्या मैदानावर पुढील महिन्यात कीर्तन महोत्सव होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लक्ष घालून या डंपिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवावा.
- देवेंद्र केळुस्कर, नागरिक, पोयनाड

छायाचित्र :

पोयनाड : पोयनाडच्या वेशीवर नवेनगर फाट्याजवळ व झुंझार ग्राऊंडसमोर डंपिंग ग्राउंडचा विळखा बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT