मुंबई

४० मिनिटांत गळती नियंत्रणात

CD

४० मिनिटांत गळती नियंत्रणात
तारापूरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून मॉकड्रिल
बोईसर, ता.१३ (वार्ताहर): पालघर जिल्हा प्रशासन, गुजरात गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त समन्वयाने तारापूर एमआयडीसी परिसरातील कॅम्बलिन सर्कलजवळ शुक्रवारी लेव्हल-३ ऑफसाईट मॉक ड्रिल यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी गुजरात गॅसच्या भूमिगत उच्चदाब गॅस वाहिनीला लागलेली नुकसान गळतीची काल्पनिक परिस्थितीवर अवघ्या ४० मिनिटात यंत्रणांनी नियंत्रणात आणली.
पालघरचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध विभागांमध्ये समन्वय साधून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. गुजरात गॅस लिमिटेडने आपत्कालीन सायरन सक्रिय करून गॅस पुरवठा थांबवण्यासाठी अपस्ट्रीम व्हॉल्व्ह बंद केले. तसेच गॅस गळती थांबल्याची खात्री करण्यासाठी देखरेख ठेवण्यात आली. मेसर्स जीएआयएलच्या म्युच्युअल एड टीमने तांत्रिक सहाय्य पुरवले. पोलिसांनी परिसराला वेढा घालत वाहतूक नियंत्रणात ठेवली होती. तर आरोग्य विभागाच्या सिव्हिल सर्जन डॉ. वैभवी देशपांडे यांनी तातडीने रुग्णवाहिका पाठवून जखमींना उपचारासाठी हलवले. अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी वैभव तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाने कार्य केले.
-----------------------------
चोवीस तास सेवा
या सरावातून औद्योगिक आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी आणि विविध विभागांमधील प्रभावी समन्वय अधोरेखित झाला. यावेळी बोईसरमध्ये जीजीएलचे चोवीस तास आपत्कालीन प्रतिसाद पथक तैनात आहे. कोणत्याही रस्त्यावर, सोसायटीत खोदकाम करण्यापूर्वी आपत्कालीन क्रमांकावर आगाऊ कळवावे, असे आवाहन गुजरात गॅस लिमिटेडचे भावेश दवे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT