उन्हापासून बचावासाठी नागरिकांचा शीतपेयांकडे कल
पेण, ता. १२ (वार्ताहर) : तालुक्यात यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली असून नागरिकांना उष्मघाताचे चटके बसू लागले आहेत. यामुळे नागरिक पुरते हैरण झाले असून त्यांनी आपला मोर्चा आता लिंबू सरबत, ज्युस, लस्सी, ताक, उसाचा रस यासह थंड शीतपेये पिण्याकडे वळविला आहेत.
तालुक्यात सध्या विचित्र वातावरण अनुभवण्यास मिळत आहे. सकाळी धुक्याची चादर दुपारी पुन्हा कडक उन्हाची तीव्रता जाणवत आहे. हवामानातील या चढ-उतारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळवण्यासाठी पेणमधील बाजारपेठांमध्ये आता शीतपेयांची दुकाने गर्दीने फुलू लागली आहेत. लिंबू सरबत आणि ताक यांसारख्या आरोग्यदायी पेयांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून अचानकपणे वातावरणात बदल निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर ऊन जाणवायला लागले आहे. नागरीक दुपार ते संध्याकाळपर्यंत थंडपेय पिण्यासाठी येत असतात. लस्सी, मॅंगो, चिकू, ऑरेंज, पायनापल तसेच कॉकटेल यासारखे शीतपेयांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.
- मतीन ज्यूस सेंटर पेण
दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे शहरात कामानिमित्त बाजारपेठेत आल्यावर पहिले ज्यूस सेंटरच्या गाडीवर जाऊन थंडपेय घ्यावे लागत आहे.
- लक्ष्मण पाटील, नागरीक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.