भिवंडीत ८४ गॅस सिलिंडर जप्त
शिधावाटप भरारी पथकाची कारवाई
भिवंडी, ता. १४ (वार्ताहर) ः इराण- इस्राईल- अमेरिका युद्धाच्या झळा जगभराला बसत आहेत. त्यामुळे सर्वत्र इंधन व गॅसटंचाई भासू लागली आहे. अनेक भागात व्यावसायिक गॅस सिलिंडरची काळाबाजार सुरू झाल्याने नियंत्रणासाठी भरारी पथकांची नेमणूक शिधावाटप विभागाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, भिवंडीत शिधावाटप नियंत्रण फ विभाग कार्यालयाच्या भरारी पथकाने कारवाई करत ८४ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.
भारतात गॅसटंचाई प्रकर्षाने जाणवू लागलेली असल्याने शासनाने व्यावसायिक गॅस सिलिंडरपुरवठा बंद केला आहे. युद्धामुळे सर्वत्र गॅसची टंचाई होत असतांना गॅसच्या सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी या पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे. ठाणे उपनियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ कार्यालयाचे उपनियंत्रक प्रशांत काळे यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकातील निरीक्षक भगवान खंडेराव यांना भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील एका गोदामात अनधिकृत गॅस सिलिंडरचा साठा केला असल्याची माहिती मिळाली होती. भिवंडी शिधावाटप अधिकारी रत्नदीप सावंत, गणेश हरणे, मनीष शास्त्री यांनी वळपाडा येथील वर्धमान कंपाउंड येथे सापळा रचला असता त्याठिकाणी तीन टेम्पोंमधून ८४ सिलिंडर आढळून आले. ज्यामध्ये भारत गॅस, हिंदुस्तान पेट्रोलियम, गो गॅस, गॅस वन या कंपनीचे ४, १२, १७, १९ किलो वजनाचे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर आढळले. ज्यात ५१ रिकामे व ३३ भरलेले सिलिंडर होते. याप्रकरणी दोन टेम्पोचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची कारवाई केली जात असल्याची माहिती भरारी पथकप्रमुख भगवान खंडेराव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.