ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्या
पेण, ता. १४ (वार्ताहर) : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला मोठी झळ सोसावी लागत असताना देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील ग्रामीण भागात आणि व्यावसायिकदृष्ट्या स्वयंपाकासाठी पुन्हा चुलींचा वापर होऊ लागला आहे.
युद्धामुळे भारतातील पेट्रोल, डिझेल, गॅस, सोने-चांदी, गोडेतेल यासह वाढणारे दर यामुळे सर्वसामान्य नागरिकांची दमछाक झाली आहे. त्यातच गॅस सिलिंडरचा तुटवडा होत असल्याने केंद्र शासनाने तात्काळ व्यावसायिक सिलिंडर देणे बंद केले. तर घरगुती सिलिंडरना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, २५ दिवसांच्या ऑनलाईन बुक करण्याच्या प्रक्रियेनंतरही गॅस सिलेंडर मिळणे कठीण होत असल्याने ग्रामीण भागातील जनतेने पेण शहरातील भारत गॅस वरदान एजन्सी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सिलेंडरची होणारी कमतरता पाहता ग्रामीण भागातील आणि व्यावसायिकदृष्ट्या नागरिकांनी चुली सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे.
पूर्वीसारखे दिवस
गेले सात-आठ दिवस व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सिलेंडर मिळत नसल्याने फार मोठी अडचण होऊ लागली आहे. त्यामुळेच कुठेतरी आता चुली सुरू कराव्या लागत असल्याने पूर्वीच्या काळासारखे दिवस आता आठवू लागले असल्याचे व्यवसायिक आप्पा भिल्लारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.