मुंबई

कंत्राटी शिक्षक आक्रमक

CD

कंत्राटी शिक्षक आक्रमक
पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन
पालघर, ता. १६ (बातमीदार)ः जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेत बिगर आदिवासी सर्व समाजातील उमेदवार २०१० पासून कंत्राटी मानधनतत्त्वावर कार्यरत आहेत. अशा शिक्षकांना शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक पालघर जिल्हा परिषदेच्या कार्यालयाजवळ बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
पेसा जिल्ह्यातील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे न करता सरळ सेवेने स्थानिक उमेदवारांमधूनच करावी तसेच सध्या कार्यरत असलेल्या अनुभवी कंत्राटी शिक्षकांना शिक्षक सेवेत म्हणून प्राधान्याने नियुक्ती देण्याची मागणी आंदोलकांची आहे. तसेच पेसा जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व समाज घटकांना संविधान न्याय मिळावा, कायमस्वरूपी रोजगाराची संधी मिळावी, तसेच कंत्राटी शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्ती मिळावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. पेसा अंतर्गत आदिवासी सह बिगर आदिवासी स्थानिक कंत्राटी शिक्षकांची पालघर जिल्हा परिषदेमध्ये नेमणुका केल्या होत्या, पण बिगर आदिवासीवर अन्याय करून त्यांच्या नेमणुका झाल्या नाहीत.
-----------------------------
मुलाबाळासह सहभाग
कंत्राटी शिक्षकाने जोरदार घोषणाबाजी दिल्या. तसेच शिक्षकांमध्ये बहुसंख्य महिला आहेत. आपल्या मुलाबाळासह आंदोलनात बसलेले आहेत. या कंत्राटी शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून विविध पक्षांचे नेतेमंडळी बसले आहेत. आरक्षण बचाव समितीचे प्रशांत पाटील पी. टी. पाटील समन्वयक संतोष पावडे, राजा म्हात्रे, सुभाष मोरे, मनोज घरत, सुनील साखरे आंदोलनात सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multi Lane Free Flow: टोल प्लाझावरील गर्दी संपणार! 120 च्या वेगात गाड्या धावणार, टॅक्स आपोआप कटणार, सरकार 'ही' नवी प्रणाली लागू करणार

Vasai Crime: लग्नमंडपात महिलांसोबत अश्लील वर्तन, वऱ्हाडी भडकले अन् नको ते घडले; वसईत खळबळ, व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cidco Action: मुंबईतील अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘सिडको’ची धडक कारवाई

Shani Jayanti 2026: यंदा 15 की 16 मे, कधी आहे 'शनि अमावस्या'? जाणून घ्या योग्य तारीख, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT