

Multi Lane Free Flow News
ESakal
देशभरातील लोकांना लवकरच टोल प्लाझावरील लांबच लांब रांगा आणि अडथळ्यांच्या व्यवस्थेपासून दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गांवर एक नवीन 'मल्टी-लेन फ्री-फ्लो' (MLFF) टोल प्रणाली लागू करत आहे. ज्यामुळे वाहनांना न थांबता पुढे जाण्याची परवानगी मिळेल. टोल कर आपोआप कापला जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत या नवीन प्रणालीची घोषणा केली.