मुंबई

कुलाबा न्यायालयातून पळालेल्या आरोपीला विरारमध्ये अटक

CD

कुलाबा न्यायालयातून पळालेल्या
आरोपीला विरारमध्ये अटक
बिट मार्शलची सतर्कता; सराईत गुन्हेगार जाळ्यात

नालासोपारा, ता. ९ (बातमीदार) : कुलाबा सेशन न्यायालयातून दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या ताब्यातून पळालेल्या सराईत आरोपीला विरार येथे अटक आज करण्यात आली. चहाच्या टपरीवर झालेल्या किरकोळ वादातून त्याची ओळख उघड झाल्याने ही कारवाई शक्य झाली.
हरिसर ॲन्थोनी जोसेफ (४७) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातील रहिवासी आहे. त्याच्यावर एमआरए मार्ग, कुलाबा, वडाळा, शिवडी आणि एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे सुमारे २० गुन्हे दाखल आहेत. या आरोपीला शस्त्र बाळगणे आणि प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना ७ एप्रिलला त्याला आर्थर रोड कारागृहातून कुलाबा न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालय परिसरातून पोलिसांच्या तावडीतून तो पसार झाला होता.
दरम्यान, गुरुवारी सकाळी विरार पश्चिम येथील महापालिका प्रभाग कार्यालयासमोरील चहाच्या टपरीवर पैसे देण्याच्या कारणावरून तो गोंधळ घालत असल्याचे निदर्शनास आले. बिट मार्शल दिनेश सानप आणि सुरक्षा रक्षक अक्षय देसाई यांना संशय आल्याने त्याची चौकशी केली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्याला बोळिंज पोलिस ठाण्यात आणण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश कावळे आणि पीएसआय नवनाथ कदम यांनी चौकशी केली असता, आरोपीने कुलाबा न्यायालयातून फरार झाल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासल्यावर तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीवर घरफोडी, चोरी तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे नोंद असून, तो यापूर्वी २००७, २०१२, २०१९ आणि २०२२ या काळात तडीपारही झाला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT