वाहतूक काेंडीमुळे उरणमध्ये संताप आहे.
वाहतूक काेंडीमुळे उरणमध्ये संताप आहे.  
मुंबई

वाहतूक कोंडीनंतरही पोलिस ढिम्म

सकाळ वृत्तसेवा

उरण : तालुक्‍यातील चार बंदरे ही उरणकरांसाठी वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागली आहेत. गेल्या आठवड्यात तब्बल तीन दिवस तालुक्‍यातील वाहने कासव गतीने पुढे सरकत होती. त्यावरून हा प्रश्‍न किती भयानक आहे, हे अधोरेखीत झाले होते. विशेष म्हणजे या जीवघेण्या प्रश्‍नाकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष धुमसत आहे. 

90 च्या दशकात उरण तालुक्‍यात जेएनपीटी बंदर आले. हे बंदर पूर्ण विकसित झाले, त्या वेळी वार्षिक कंटेनर हाताळण्याची क्षमता 20 लाख होती. त्यानंतर आणखी तीन बंदरे या भागात आली. त्यामुळे तालुक्‍यात प्रत्येक रस्त्यावर कंटेनर दिसू लागले. 

आता 50 लाखांपेक्षा अधिक कंटेनर हाताळणी या बंदरांतून होत आहे. परंतु पायाभूत सुविधांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाले. हा प्रश्‍न तालुक्‍यात तापल्यानंतर बंदरांतून बाहेर पडणारे पळस्पे आणि सीबीडीपर्यंतच्या दोन्ही महामार्गांचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू झाले. परंतु ते तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळेच वाहतूक कोंडी हा प्रश्‍न जीवघेणा ठरत आहे. 

वाहतूक कोंडीमुळे दोन्ही महामार्गांसह तालुक्‍यातील सर्वच लहान-मोठे मार्ग ठप्प होतात. कधी कधी दहा किलोमीटरच्या रांगा लागतात. त्यामध्ये दोन-चार तास रखडपट्टी होते. चारही बंदरांसह बीपीसीएल, ओएनजीसी आदी कंपन्यांचेही त्यामुळे मोठे नुकसान होते. 

वहानांच्या धुरांड्यातून निघणारे विषारी वायू आज तालुक्‍यातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आणत आहेत. याबाबतही नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु त्याची दखल घेतली नाही, असे जासईतील रहिवासी जयेश म्हात्रे यांनी सांगितले. 

बेदरकार अवजड वाहतुकीचेही शेकडो नागरिक बळी ठरले आहेत. तालुक्‍यातील अपघातांमध्ये 500 पेक्षा अधिक जणांना प्राणास मुकावे लागले आहे. रस्ते अपघातांत दरवर्षी 50 पेक्षा जाणांचा मृत्यू होतो. त्यामुळे असंतोष आहे. 

वाहतूक कोंडीचा प्रश्‍न बिकट झाला आहे. अनेकांचा रोजगार त्यामुळे बुडतो. विद्यार्थ्यांचेही नुकसान होते. परंतु प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी सांगितले. 

वाहतूक कोंडी सोडवण्यापेक्षा वाहतूक पोलिस अनेक वेळा बघ्याची भूमीका घेतात. त्यामुळे असंतोष आहे. ही यंत्रणा सक्षम झाली तर उरणकरांना दिलासा मिळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

उरण तालुक्‍यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नासंदर्भात तहसील कार्यालयाने वाहतूक पोलिस, सिडको, जेएनपीटी, उरण पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागांची बैठक घेतली होती. प्रत्येक विभागाला त्यांच्या पातळीवर सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता पुन्हा 9 ऑगस्टला आढावा बैठक होणार आहे. 
- कल्पना गोडे, तहसीलदार, उरण 
 
उरणमध्ये रस्तारुंदीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कोंडी होते. वाहतूक पोलिसांनी प्रामाणिक प्रयत्न केले, तर वाहतूक कोंडी नक्कीच आटोक्‍यात येईल. 
- संतोष पवार, सचिव, उरण सामाजिक संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT