मुंबई

लोकलसंदर्भात महत्त्वाची बातमी : मेल, एक्सप्रेसच्या प्रवाशांना आता मुंबईतील लोकल प्रवासाची मुभा

कुलदीप घायवट

मुंबई, 17 : लांब पल्याच्या मार्गावरील मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांना आता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मुंबईत येणाऱ्या आणि मुंबई बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुर्नवसन विभागाने 15 डिसेंबर रोजी रेल्वेकडे केली होती. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेने  लांब पल्याच्या प्रवाशांना लोकल प्रवाशांना मुभा दिली आहे.

सीएसएमटी, एलटीटी, दादर, पनवेल, मुंबई सेंट्रल, बांद्रा टर्मिनस, बोरिवली या स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना लोकलचा पर्याय उपलब्ध नसल्याने पर्यायी वाहनाने त्यांना प्रवास करावा लागत होता. मात्र यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात होता. तसेच आर्थिक नुकसान देखील होत होते. या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने रेल्वेकडे पत्राद्वारे केली होती.

राज्य सरकारच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्ताव पाठविला होता. त्याला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतून एक्सप्रेसद्वारे बाहेर गावी जाणार्‍या आणि येणार्‍या प्रवाशांना देखील लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.  प्रवाशांना  लांबपल्याच्या रेल्वे गाडीचे तिकीट असणे अनिर्वाय आहे.

प्रवाशांना लोकलचे फक्त सिंगल तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे गाडीच्या सुटण्याच्या वेळेपासून 6 तासाच्या कालावधी प्रवास करण्याची मुभा आहे.

travelers of mail and express trains are now allowed to travel by local train to reach desired destination

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

मी सेटवरून रडत घरी आलेले... निवेदिता सराफ यांनी सांगितला हिंदी मालिकेचा कटू अनुभव; म्हणाल्या, 'माझ्या आईने मला...'

Monsoon 2026: राज्यासाठी धोक्याची घंटा, यंदा पाऊस कमी होणार.. चिंता वाढली..

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट

Pachod Water Issue : पाणीपुरवठा योजनांचा केवळ फार्स ..! तीन योजना राबवूनही थेरगाव येथे तहान भागविण्यासाठी जिवघेणी कसरत

SCROLL FOR NEXT