मोठी बातमी : बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरला NCB ने बजावला समन्स

सुमित बागुल
Thursday, 17 December 2020

कारण जोहरच्या घरी झालेली कथित पार्टी आणि त्या पार्टीमधील दृश्य सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालेली.

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येतेय. प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB ने समन्स बजावला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर NCB कडून बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन तपासलं जातंय. सुशांतच्या प्रकरणानंतर NCB ने अनेक मोठ्या कारवाया करत अनेक ड्रग्स पेडलर्सचा गोरखधंदा उघड केला. दरम्यान बॉलिवूडमधील मोठं नाव, करण जोहरला आता NCB ने समन्स बजावला आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात दिग्दर्शक करण जोहरची चौकशी करण्यात येणार आहे. 

महत्त्वाची बातमी : उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक ? मोदींच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठीच्या प्रास्तवित जागेवर उभारलं जाणार मेट्रो कारशेड?

कारण जोहरच्या घरी झालेली कथित पार्टी आणि त्या पार्टीमधील दृश्य सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालेली. यानंतर कारण जोहर आणि बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत मोठी चर्चा सुरु झालेली. यानंतर कारण जोहरने स्वतः एक ट्विट करत याबाबतचा खुलासा केला होता. दरम्यान NCB मार्फत आता करण जोहरला समन्स बजावण्यात आला आहे.   

नुकतीच NCB मार्फत अभिनेता अर्जुन रामपाल याचीदेखील ड्रग्स प्रकरणात चौकशी करण्यात आली. अर्जुन रामपालला NCB ने आता दुसऱ्यांदा समन्स बजावला आहे.  

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

NCB summoned Bollywood Producer and director Karan johar dharama production

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCB summoned Bollywood Producer and director Karan johar dharama production