ulhasnagar corporation contractor attack case strike of other contractors
ulhasnagar corporation contractor attack case strike of other contractors Sakal
मुंबई

Ulhasnagar : उल्हासनगर पालिका कॉन्ट्रॅक्टर वरील हल्ल्याच्या निषेधार्थ कॉन्ट्रॅक्टरांचे कामबंद आंदोलन

दिनेश गोगी

उल्हासनगर : महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर विशाल माखीजा यांच्यावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.या निषेधार्थ एकवटलेल्या पालिका कॉन्ट्रॅक्टरांनी सुरू असलेल्या विकास कामांना थांबवून कामबंद आंदोलन पुकारले असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

प्रेम झा यांच्या झा.पी.कंपनी च्या वतीने शहरात महानगरपालिकेच्या अखत्यारीत रस्त्यांचे काम सुरू आहे.तीन दिवसांपूर्वी कंपनीचे प्रतिनिधी व पालिकेचे कॉन्ट्रॅक्टर विशाल माखीजा हे दहाचाळ रोड,हॉटेल सेंट्रल प्लाझा जवळील रस्त्याची पाहणी करत असताना 10 ते 12 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांच्या गाडीची तोडफोड केली होती.या हल्ल्यात गंभीरपणे जखमी झालेल्या विशाल माखीजा यांच्यावर बालाजी या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हल्ल्याच्या निषेधार्थ आक्रमक झालेले उल्हासनगर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सुनील बिजलानी,जीतू आहूजा,विकास सिंह,इंद्रजीत सिंह,अजय सिंह,रवि जयसिंघानी,जीतू गुरशानी,सतीश खिलनानी,शशि ठाकुर,शशिकांत जगतियानी,शंकर तेजानी,जॅकी रिझवानी,कमलेश रामरखियानी,विकी मेंघवानी,

परेश मलबारी आदींनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.असोसिएशनच्या वतीने आमदार कुमार आयलानी,पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे,सहायक पुलिस आयुक्त अमोल कोळी,विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांना निवेदन देण्यात आले असून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT