crime on bigus doctor
crime on bigus doctor sakal
मुंबई

Ulhasnagar Crime : बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर महानगरपालिकेचा छापा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दिनेश गोगी

उल्हासनगर - कर्नाटक मधील बी.एच.एम.एस धारक असलेल्या एका डॉक्टरकडे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही त्याने दवाखाना सुरू केल्याचा बोगसगिरीचा प्रकार उल्हासनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने मारलेल्या छाप्यात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे नामफलक नसलेला हा 8 बेडचा दवाखाना असून याप्रकरणी डॉक्टरवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅम्प नंबर 5 सेक्शन 40 मध्ये जीवनघोट हॉल समोर डॉ.भरतकुमार जैस्वाल हे बोगस वैद्यकीय व्यावसाय करत असल्याची तक्रार वैद्यकीय आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशान्वये व उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी पगारे यांनी पोलीस बंदोबस्तात छापा मारला.

चौकशीत डॉ. भरतकुमार जैस्वाल हे कर्नाटक मधील बी.एच.एम.एस. धारक असून त्यांच्याकडे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याची बोगसगिरी उघड झाली आहे. विशेष म्हणजे दवाखान्यावर नामफलक नसून आत मध्ये 8 बेडची आणि रुग्णांना ऍडमिट करण्याची व्यवस्था होती.

याप्रकरणी डॉ. जैस्वाल यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील बोगस डॉक्टरची शोधम घेण्याची व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT