प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करताना वासुदेव.
प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करताना वासुदेव. 
मुंबई

वासुदेव करतोय उमेदवाराचा प्रचार

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या वासुदेवाच्या माध्यमातून प्रचार केला जात असल्याचे पाहायला मिळत आह; तर शेतकरी कामगार पक्षाचे खटारा हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम पाठीवर डिजिटल ३ डी स्क्रीन लावून फिरणाऱ्या युवकांच्या फळीकडून केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रचाराच्या पहिल्या फेरीत मागे पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडूनदेखील प्रचारात मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले, माथाडी कामगारनेते नरेंद्र पाटील हे सभांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. तसेच शहरी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून मॉर्निग वॉकद्वारे प्रचार केला जात आहे. 

हरेश केणी यांची रेल्वेस्थानकाला भेट 
शेकाप उमेदवार हरेश केणी यांनी सोमवारी पहाटे खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसराला भेट देत स्थानिक रिक्षाचालक, प्रवासी; तसेच पहाटेच्या वेळेत रेल्वेस्थानक परिसरात सकाळचा फेरफटका मारायला येणाऱ्यांची भेट घेत आपल्या चिन्हाचा प्रचार केला. 

दुचाकी रॅली 
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी रविवारी कळंबोलीमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये आमदार ठाकूर यांच्यासोबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे हेदेखील उपस्थित होते. भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीत शेकडो युवक आपल्या दुचाकीसह उपस्थित असल्याने युवकांचे मोठे समर्थन या रॅलीला लाभल्याचे पाहायला मिळाले. रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, भाजप कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेवक अमर पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT