विरार पूर्वेतील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमधील भाज्यांची आवक घटली आहे.
विरार पूर्वेतील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमधील भाज्यांची आवक घटली आहे.  
मुंबई

वसई-विरारमध्ये भाज्यांचे दर तिप्पट

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा ः कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महापुराचा फटका वसई-विरार आणि नालासोपाऱ्यातील भाजी मार्केटला बसला आहे. येथील बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे भाज्यांच्या दरात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे येथील किरकोळ भाजीविक्रेत्यांसह नागरिकांना महागाईच्या त्रास सोसावा लागत आहे. 

गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हे पाण्यात आहेत. त्यामुळे सर्व मुख्य महामहार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती. त्यामुळे मुंबईसह वसई-विरार, नालासोपारा परिसरात येणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम झाला. येथील बाजारात भाजीपालाच पोहोचला नसल्याने आहे त्या भाज्यांची विक्री करण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. आवक कमी असल्यामुळे चढ्या दऱ्याने भाज्यांची विक्री करण्यात आली.

सध्या पूर ओसरायला लागल्याने वाहतूक सुरू झाली आहे; मात्र पुरामुळे भाजीपाला पाण्यात गेल्याने अद्यापही आवक वाढली नसल्याने याचा फटका भाजी मार्केटला मोठा बसला आहे. सध्या श्रावण महिना असल्याने भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे वसई-विरार परिसरातील भाज्यांचे दर दुपटी-तिपटीने वाढले आहेत. 

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे महापूर आल्याने वसई-विरार परिसरात येणारा भाजीपाला तीन दिवस बंदच होता. आता दोन दिवसांपासून त्याची आवक सुरू झाली आहे; पण भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. रोज विक्रीसाठी आम्ही 5 ते 6 हजारांची भाजी खरेदी करत होतो. त्याच भाजीसाठी आता आम्हाला 10 ते 15 हजार द्यावे लागत आहेत. त्यामुळे आम्हाला भाज्यांचे भाव वाढवावे लागले आहेत. 
पप्पू राजभर,  किरकोळ भाजीविक्रेते, विरार पूर्व, सावित्रीबाई फुले भाजी मार्केट 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT