मुंबई

वाहनचोरीप्रकरणी अधिकाऱ्यासह दोघे निलंबित 

सकाळवृत्तसेवा

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरी येथील कार्यालयातून चोरीला गेलेल्या वाहनाची उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी यांनी गंभीर दखल घेत कामात हलगर्जी करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 

महेश कदम (जवान), विजय उतेकर (जवान) आणि एस. एस. फडतरे (दुय्यम निरीक्षक) अशी या निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दहीहंडीच्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरीस्थित कार्यालयातून भरदिवसा एक गाडी चोरीला गेली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर ही गाडी पुण्यात सापडली होती. मूळचा पश्‍चिम बंगालचा असलेला अमित हरादन बोनिक (19) या चोरट्याने हा कारनामा केला होता. कामासाठी मुंबईत आल्यानंतर त्याची बॅग चोरीला गेली. नोकरीचा शोध घेत अमित ठाण्यात आला.

कोपरीतील उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात दोन दिवस फिरल्यानंतर त्याने गाडी पळवून पुणे गाठले. कोपरी पोलिसांनी पुण्यातून गाडी ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली; परंतु या गाडी चोरीप्रकरणी उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तिघांवरही कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT