मुंबई

कोरोनाचा धोका पश्चिम उपनगरात? कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सक्रिय वाढ

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर आता हळूहळू खाली आला आहे. दरम्यान, दिवाळीनंतर पश्चिम उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय केसेसमध्ये नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईतील 48 टक्के केसेस हे पश्चिम उपनगरातील आहेत. बोरिवली, अंधेरी, कांदिवली, मालाड, गोरेगाव, दहिसर आणि वांद्रे येथे सर्वाधिक रुग्णांची नोंद केली गेली आहे. 

पालिका अधिकाऱ्यांच्या मते पश्चिमेकडील उपनगरामध्ये लॉकडाऊन उठवल्याने आणि चाचणीत वाढ झाल्याने रुग्णांची वाढलेली संख्या दिसत आहे. 

महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, बोरिवलीचा समावेश असलेल्या आर-सेंट्रल वॉर्डमध्ये सर्वात जास्त प्रकरणांची नोंद इतर कोणत्याही वॉर्डपेक्षा जास्त झाली आहे. आर-सेंट्रलमध्ये डिसेंबरपर्यंत 18, 087 केसेस नोंदवले गेले. त्यापैकी 1,176 सक्रिय आहेत. तर के-पश्चिम प्रभाग (जोगेश्वरी पश्चिम, ओशिवरा आणि अंधेरी पश्चिम) येथे 1,088 सक्रिय केसेस आहेत. आर-दक्षिण (कांदिवली) मध्ये 1,000 सक्रिय केसेस; के-पूर्व वॉर्ड (जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व आणि विलेपार्ले पूर्व) मध्ये 963, पी-उत्तर (मालाड) मध्ये 918 सक्रिय प्रकरणांमध्ये पी-दक्षिण (गोरेगाव) मध्ये 777 सक्रिय केसेस आहेत. आर-उत्तर (दहिसर) मध्ये 525 सक्रिय प्रकरणे केसेस नोंदवली गेले आहेत. एच- पश्चिम (वांद्रे पश्चिम, सांताक्रूझ पश्चिम आणि खार पश्चिम) येथे 627 आणि एच - पूर्व (वांद्रे पूर्व, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि सांताक्रूझ पूर्व) येथे 472 सक्रिय रुग्णांची नोंद झाली.

वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ ही लॉकडाऊन उठवल्यामुळे आणि जास्त फिरणारी लोकसंख्या ही पश्चिम उपनगरातील आहे. शहरातील इतर भागांच्या तुलनेत या भागात विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे. शहराच्या इतर प्रभागांच्या तुलनेत पश्चिम उपनगरात कोविड -19 च्या चाचण्याही सर्वाधिक आहे. शिवाय, आपल्याकडेही अनेक नागरिकांची स्वेच्छेने चाचणी सुरू आहे आणि त्यामुळे या प्रभागांमध्ये सक्रिय प्रकरणे अधिक असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, चर्नी रोड, मरीन लाईन्स, काळबादेवी, कुलाबा आणि चर्चगेट यासारख्या भागात व्यापलेल्या प्रभागांमध्ये सर्वात कमी सक्रिय रुग्णांची नोंद आहे.

धारावी येथे सोमवारी केवळ 9 नवीन कोविड-19 ची केसेस आढळले होते. धारावीची संख्या 3 हजार 692 एवढे रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. त्यापैकी 3 हजार 361 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

western suburbs Corona active cases Increase 48 per cent reported

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT