File Photo 
मुंबई

कामावरुन काढून टाकल्याने 'तिने' उचलले 'हे' पाऊल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कांदिवली परिसरातील चारकोपमधील रॉक एव्हेन्यू इमारतीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. डिंपल वाडिलाल असं या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

डिंपल वाडिलाल या आपल्या आईसह कांदिवलीतील चारकोपनजीक असलेल्या एका इमारतीत राहत होत्या. ३१ डिसेंबर रोजी त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यानंतर त्या मानसिक तणावाखाली वावरत होत्या. तसेच त्यांनी आपल्या मित्र परिवार आणि निकटवर्तीयांशी बोलणेदेखील सोडले होते. गुरूवारी संध्याकाळी त्यांनी आपल्या इमारतीवर जाऊन उडी घेत आपला जीवनप्रवास संपवला. दरम्यान, स्थानिकांनी वाडिलाल यांना त्वरित कांदिवलीतील शताब्दी रूग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सध्या आम्ही अधिक तपास करत आहोत. डिंपल यांनी आपल्या घरात सुसाईड नोट ठेवली आहे का, हे पाहणार आहोत.

- विठ्ठल शिंदे, वरिष्ठ पोलिस अधिकारी, चारकोप पोलीस ठाणे

स्थानिकांचा वाचवण्याचा प्रयत्न निष्फळ

ज्यावेळी त्या उडी मारण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी स्थानिकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. खाली असलेल्या एका व्यक्तीने त्यांना धरण्याचा प्रयत्न केला. यात त्या व्यक्तीच्या खांद्याला दुखापत झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT