esakal | मंत्रिमंडळ खातेवाटप : कुणाला कोणतं खातं? वाचा पहिली यादी
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्रिमंडळ खातेवाटप : कुणाला कोणतं खातं? वाचा पहिली यादी
 • आज संध्याकाळी खातेवाटपाची अधिकृत घोषणा होऊ शकते

मंत्रिमंडळ खातेवाटप : कुणाला कोणतं खातं? वाचा पहिली यादी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात पहिला मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबर रोजी झाला. यामध्ये 36 मंत्र्यांनी शपथ देखील घेतली मात्र 30 तारखेपासून आज तीन तारखेपर्यंत कुणाला कोणतं खातं याबाबत अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. माध्यमांसमोर येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून खातेवाटपावरून कोणताही वाद नाही असं सांगण्यात आलं. मात्र असं असलं तरीही अधिकृत यादी मात्र जाहीर केली गेली नाही. 

मोठी बातमी :  धक्कादायक, दुर्लक्षामुळे मुंबईकरांवर होऊ शकतो विषप्रयोग

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोघांनी म्हणजे एकूण सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे सहा मंत्र्यांवर सर्व खाती सांभाळण्याची वेळ आली आहे. मात्र तेंव्हाच्या सूत्रात आणि आताच्या खातेवाटपात काही खात्यांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. 

आता मंत्रिमंडळ विस्तार झालाय. चर्चा होती की काँग्रेसच्या मुळे खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारला उशीर होतोय, मात्र आता काँग्रेस पक्षाने खातेवाटपाचा वाद संपुष्टात आणलाय.      

Inside Story : आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी 'हा' आहे सरकारचा 'मास्टरप्लान'

कुणाला कोणतं खातं मिळू शकतं ? (सूत्रांकडून आलेली यादी)

 1. बाळासाहेब थोरात - महसूल
 2. अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम खाते
 3. अमित देशमुख - शालेय शिक्षण
 4. यशोमती ठाकूर - महिला व बालविकास खाते
 5. वर्षा गायकवाड - वैद्यकीय शिक्षण
 6. सुनील केदार - ओबीसी विभाग
 7. असलम शेख -वस्त्रोद्योग
 8. नवाब मलिक - कामगार
 9. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय
 10. बाळासाहेब पाटील - सहकार व पणन खाते
 11. विजय वडेट्टीवार किंवा नितीन राऊत - ऊर्जा खात्यावर 
 12. दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क आणि किमान कौशल्य
 13. शिवसेनेचे अनिल परब - मुख्यमंत्री कार्यालयाचे मंत्री
 14. आदित्य ठाकरे - पर्यावरण आणि उद्योग किंवा उच्च व तंत्रशिक्षण
 15. संजय राठोड - परिवहन
 16. गुलाबराव पाटील - कृषी

अनिल देशमुख यांना गृह खात मिळणार आहे अशी माहिती समोर येतेय.  मात्र गृह खात्यावरून वाद कायम आहे असं देखील सूत्रांच्या माहितीनुसार कळतंय. गृह खातं हे जयंत पाटील यांच्याकडे जावं अशी शरद पवार आणि अजित पवार यांचा आग्रह असल्याची माहिती देखील मिळतेय.  

पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला.. 

महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांचा फॉम्युला ठरला आहे. शिवसेनेचे १३ राष्ट्रवादीचे १३ तर काँग्रेसचे १० पालकमंत्री असणार आहेत. आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मात्र अद्याप पालकमंत्र्यांची देखील यादी जाहीर झालेली नाही. आजच ही यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. 
 

Webtitle : maharashtra cabinet roles and duties first list from sources in out