car and two wheeler accident one killed and one injured traffic police hospital
car and two wheeler accident one killed and one injured traffic police hospital Sakal
नांदेड

Nanded Accident News : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला उडवले एक ठार एक जखमी

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर : जिल्हा परिषद अर्धापूरहुन चाभऱ्याला गावी परत जाताना अर्धापूर हिंगोली रस्त्यावरील शहरातील संत सावतामाळी चौकात पार्डीकडून भरधाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जख्मी झाला आहे.

हा अपघात बुधवारी (ता २२) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास झाला आहे.या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.यातील अपघातग्रस्त हे चाभरा (ता अर्धापूर) येथील आहेत.

या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, चाभरा येथील प्रभाकर वसंतराव पाटील कल्याणकर (वय ४२), विकास कोंडीबा भंडारे (वय ४५) हे आपल्या दुचाकीवरून(एमएच २६ ए क्यु ८०२६ )अर्धापूर मार्गाने चाभऱ्याल जात असतांना त्यांची दुचाकी पांगरीकडे जाणाऱ्या संत सावतामाळी चौकात आली आसता पार्डीकडून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने(एमएच १४ जे ई ९८२३) दूचाकीला धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.वैदकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केली असता प्रभाकर वसंतराव पाटील कल्याणकर यांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली.तर विकास कोंडीबा भंडारे यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

मयत प्रभाकर वसंतराव कल्याणकर यांच्या पार्थिवावर चाभरा येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे तीन मुली एक मुलगा, पत्नी आस परिवार आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT