Two wheeler thieves big challenge to police nanded
Two wheeler thieves big challenge to police nanded sakal
नांदेड

दुचाकी चोरट्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीला जाण्याचे सत्र काही थांबायला तयार नाही. परिणामी या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून, नागरिकांमध्येही मोठी दहशत निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडत आहे. पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद होत असला तरी चोरट्यांचा शोध घेण्याची तसदी कुणीही घेताना दिसत नाही. परिणामी दुचाकी चोरट्यांची हिंमत आणखीच बळावल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांचे जाळे शहरासोबतच ग्रामीण भागातही पोचले असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) विविध पोलिस ठाण्यात एकूण आठ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. गजानन धर्माजी अकडवाड (रा. धनेगाव) यांची ४० हजार रुपयांची दुाकी (एमएच-२६, एझेड-१५१६) शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरून चोरीला गेली असून, वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. कपिल रामजी नरवाडे (रा. कासरखेडा, ता.अर्धापूर) यांची ९६ हजार रुपयांची होंडा शाईन कंपनीची दुचाकी (एमएच-२६, बीव्ही-२०६१) शिवनेरी मटन खानावळ कासरखेडा येथून चोरीला गेली असून, अर्धापूर पोलिसांत गुन्हा नोंद केला. मारती पिराजी निलेवाड (रा. बेलदरा, ता.उमरी) यांची १७ हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच-२६, एई-४५५३) जिनींग उमरी येथून चोरीला गेली आहे. उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सायलु मोगलाजी वद्देवार (रा. वाघी) यांची ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच-२६, एई-६५९५) वामनराव पावडे मंगल कार्यालय येथून चोरीला गेली. तसेच प्रवीण कमलाकर मुळे (रा. परिमलनगर) यांची ९० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच-२४, बीएन-१७६०) गंगा निवास परिमलनगर येथून चोरीला गेली असून, दोन्ही गुन्हे भाग्यनगर पोलिस ठाण्यात दाखल केले आहेत.

याशिवाय देगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सायलु मोगलाजी वद्देवार (रा. शिवबानगर) यांची १५ हजार रुपये किंमतीची लुना (एमएच-२६, एव्ही-६५०७) तसेच सचिन गंगाधरराव तडखेले (रा. लिंगापूर,ता.मुखेड) यांचीही २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच-२६, एए-७१०९) चोरीला गेली आहे. तसेच पोतन्ना रयतुवार (रा. कुंडलवाडी) यांची ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच-२६, डब्ल्यु-२४०२) बालाप्रसाद गंगुलवार यांच्या घरासमोरून चोरीला गेली असून, बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

नेटवर्क गेले कुठे

खून, गंभीर गुन्हा घडल्यास पोलिस अवघ्या काही तासांत आरोपींचा छडा लावून मुसक्या आवळतात. मात्र, दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाही चोरटे नेमके कुठुन येतात आणि वाहनाची विल्हेवाट कशाप्रकारे लावतात, याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. पोलिसांचे नेटवर्क गेले तरी कुठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT