Heavy rains in two circles.jpg 
नांदेड

नांदेडमधील दोन मंडळात अतिवृष्टी.....कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी (ता. दोन) दुपारनंतर झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्याला चिंब केले आहे. रोहिणी नक्षत्रातील हा मान्सूनपूर्व पहिलाच मोठा पाऊस असल्याने शेतकरीही पेरणीपूर्व कामाला लागले आहेत. नांदेड तालुक्यातील लिंबगाव मंडळात ७३ तर हिमायतनगर तालुक्यातील सरसम मंडळात ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात बुधवारी (ता. तीन) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात एकूण ३००.६५ मिलिमीटर तर सरासरी १८.७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तापमानाचा पारा खालावला
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. या पावसामुळे जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. तसेच हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही ९५ टक्क्यावर पोहोचल्याने जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेपासून सुटका मिळाली आहे. मंगळवारी (ता. दोन) दुपारनंतर जिल्ह्याच्या सर्वच भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. हा पाऊस नांदेड, भोकर, कंधार, हिमायतनगर, मुखेड, देगलूर या तालुक्यात अधिक झाला. तर इतर सर्वच तालुक्यात पावसाचे आगमन झाले. 

दोन मंडळात अतिवृष्टी
हा पाऊस नांदेड तालुक्यातील लिंबगाव मंडळात ७३ मिलिमीटर तर हिमायतनगर तालुक्यातील सरसम मंडळात ६६ मिलिमीटर नोंद झाल्यामुळे या दोन मंडळात अतिवृष्टीची नोंदणी झाली. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रावरही बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा वेळेवर व चांगल्या पावसाचा पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकरीही सुखावले आहेत. 

मंडळनिहाय झालेला पाऊस 
(मिलीमीटरमध्ये)
नांदेड १९, तुप्पा १७, विष्णुपुरी २२, वसरणी १९, वजीराबाद २५, नांदेड ग्रामीण २३, तरोडा २४, लिंबगाव ७३, मुदखेड नऊ, मुगट १२, बारड २४, अर्धापूर १२, दाभड ११, मालेगाव २२, भोकर २८, किनी २६, मोघाळी १०, मातूळ ३६, उमरी सात, सिंधी व गोळेगाव प्रत्येकी दहा, कंधार ३१, कुरुळा १४, उस्माननगर १०, पेठवडज २४, फुलवळ ३५, बारुळ २२, लोहा २६, माळाकोळी सतरा, कलंबर १८, सोनखेड ११, शेवडी १५, कापशी २१, किनवट १६, इस्लापूर १४, मांडवी २३, बोधडी सात, दहेली १५, जलधारा सहा, शिवनी ११, माहूर १९, वानोळा १०, वाइ चार, शिंदखेड १२, हदगाव २१, तामसा १७, मनाठा २०, पिंपरखेड सतरा, निवघा सहा, तळणी १५, आष्टी २८, हिमायतनगर १३, सरसम ६६, जवळगाव २४, देगलूर ३९, खानापूर ४८, शहापूर ३५, मरखेल नऊ, हाणेगाव ३१, माळेगाव (म) १७, बिलोली नऊ, आदमपूर १९, कुंडलवाडी व सगरोळी प्रत्येकी सहा, धर्माबाद १६, जारीकोट नऊ, करखेली २४, नायगाव १४, नरसी १५, मांजरम २९, कुंटूर १३, मुखेड २८, जांब ३४, जाहूर १०,  चांडोळा १४, मुक्रामाबाद ३४, बाऱ्हाळी २०. 

तालुकानिहाय झालेला पाऊस

(मिलीमीटरमध्ये)
नांदेड २७.७५, मुदखेड व अर्धापूर प्रत्येकी १५, भोकर २५, उमरी नऊ, कंधार २२.६७, लोहा १८, किनवट १३.१४, माहूर ११.२५, हदगाव १७.७१, हिमायतनगर ३४.३३, देगलूर २९.९३, बिलोली ८.४०, धर्माबाद १६.३३, नायगाव १५ व मुखेड २२.१४. एकूण ३००.६५ मिलिमीटर तर सरासरी १८.७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाची वार्षीक टक्केवारी ५.५४ टक्के नोंदली आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माहूर गडावरून परतताना भीषण अपघात! १०० फूट खोल दरीत टेम्पो कोसळला; यवतमाळच्या ३ भाविकांचा दुर्दैवी अंत

Aaryavir Sehwag Century : १९ चौकार, ८ षटकार! वीरूच्या लेकाचा जलवा, आर्यवीर सेहवागने १४३ चेंडूंत कुटल्या १७३ धावा...

Karveer Police Action : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खुपिरेतील 'वरपे फार्म हाऊस'वर पोलिसांची धाड; अर्धनग्न अवस्थेत डान्स करणाऱ्या तीन तरुणांसह एका महिलेला घेतलं ताब्यात

Marathi News Live Updates: दसऱ्याच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयात 26 तारखेला सुनावणी, सीजेपी आणि काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात व्यापारी संघटनांची याचिका

Tukaram Mundhe MPSC News : एमपीएससी पेपरफुटी चौकशी समितीच्या सचिवपदाचे तुकाराम मुंढेंना अधिकृत आदेशच मिळाले नाहीत; मुंढे नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT