file photo
file photo 
नांदेड

ध्येय ठरवून कठोर परिश्रम केल्यास हमखास यश- वर्षा ठाकूर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शालेय जीवनात ध्येय ठरवून कठोर परिश्रम केल्यास हमखास यश मिळते, हा आशावाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी लोहा तालुक्यातील डेरला गावच्या विद्यार्थ्यांना दिला.

शाळेतली सातवीची विद्यार्थिनी गौरी शिंदे हीने घेतलेल्या मुलाखतीत वर्षा ठाकूर यांनी स्वत: ची जडण- घडण सांगत तुम्हीही तुमचं व्यक्तिमत्त्व सर्वगुणसंपन्न बनवा, याला परिस्थिती आडवी येत नाही. प्रामाणिकपणा, परिश्रम आणि लक्ष्य ठरवून अभ्यास केल्यास यशाचा मार्ग सापडतो, असे सांगून विद्यार्थ्यांनी बनविलेली हस्तलिखिते पाहून शाळेच्या नवोक्रमशीलतेचे कौतुक केले. ग्रामविकासासाठी महिलांनी पुढे येण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या तथा जि. प. सदस्या प्रणिता देवरे (चिखलीकर) होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, माजी उपसभापती लक्ष्मण बोडके, गटविकास अधिकारी प्रकाश जोंधळे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात प्रणिता देवरे चिखलीकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमातून पूरक कृती व चांगल्या गोष्टी केल्यास आयुष्यात प्रगतीच्या वाटा अधिक सोप्या होतात. शाळेच्या सर्व उपक्रमशील शिक्षक व गावकऱ्यांचे कौतुक करून विकासकामासाठी चिखलीकरांचे सदैव सहकार्य राहील, असे सांगितले. 

माझं गाव सुंदर गाव उपक्रमात दोन्ही रणरागिणींनी चांगला सुसंवाद साधून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. प्रारंभी सांजवेळी रांगोळ्यांनी सजवलेल्या प्रसन्न वातावरणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा यथोचित सत्कार, ग्रामपंचायत अपंग निधीचे नऊ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप, जलजीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक नळजोडीचे उद्‌घाटन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नारायण कळकेकर, उमाकांत शिंदे, कामाजी कदम, विठ्ठल सोळंके, देवराव कदम, उत्तमराव शिंदे, गुलाब शिंदे, बालाजी शिंदे, नंदकिशोर शिंदे, आत्माराम राजेगोरे, माधवराव शिंदे, चांदू धुमाळे, तुकाराम सालकमवाड, ग्रामसेवक अभिजीत भोसले, सहशिक्षिका मनीषा पवार, दीपाली सनपूरकर, ज्योती हंबर्डे यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक राज्य पुरस्कारप्राप्त पंडित पवळे यांनी तर सुरेख सूत्रसंचालन उत्तम क्षीरसागर यांनी केले. शेवटी आभार दत्तात्रय पांचाळ यांनी मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT