Nanded University
Nanded University sakal
नांदेड

Nanded University : जागतिक लेखक परिषदेचे पृथ्वीराज तौर यांना निमंत्रण ; नायजेरियात एप्रिलमध्ये उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

नवीन नांदेड : नायजेरियाची राजधानी अबुजा येथे एप्रिलमध्ये होणाऱ्या पहिल्या जागतिक लेखक परिषदेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख आणि लेखक डॉ. पृथ्वीराज तौर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रायटर्स’, ‘युरेशियन पीपल्स असेम्ब्ली’, ‘युनेस्को’ आणि ‘पेन अफ्रिकन रायटर्स असोसिएशन’तर्फे चार ते सहा एप्रिलदरम्यान बुजा येथे ही परिषद होणार आहे. युरेशियन असेम्ब्लीच्या अध्यक्ष मार्गारिटा अल आणि पेन आफ्रिकाचे महासचिव डॉ. वले ओकेदिरान यांनी स्वतंत्रपणे डॉ. पृथ्वीराज तौर यांना परिषदेचे निमंत्रण पाठवले आहे. ‘भारतीय साहित्य आणि विश्वबंधुता’ या विषयावर डॉ. तौर परिषदेत विचार मांडतील.

परिषदेसाठी नायजेरियाचे उपराष्ट्रपती कासीम शेट्टीमा, नोबेल पुरस्कारप्राप्त लेखक वोले सोयिंका, युनेस्कोच्या गुडविल राजदूत अलेक्झांड्रा ओचिरोव्हा, नायजेरियाच्या सांस्कृतिक मंत्री हन्नतू मुसावा, शिक्षणमंत्री ताहीर मम्मन, स्मीरनोव्हा एस. के. यांची उपस्थिती लाभणार आहे. आधुनिक जगातील समकालीन प्रश्नांविषयी वेगवेगळ्या सत्रांमध्ये चर्चा होणार आहे.

सातव्या लिफ्ट साहित्य महोत्सव व युनेस्को जागतिक कविता दिनाचे आयोजनही या काळात करण्यात येणार आहे. डॉ. तौर हे नव्या पिढीतील कवी, अनुवादक व साहित्य समीक्षक आहेत. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य असून, ‘वर्ल्ड पोएट्री मूव्हमेंट’च्या मराठी विभागाचे निमंत्रक देखील आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: पोर्श अपघात प्रकरणी ससूनचा डॉक्टर तावरेच्या घरी पोलिसांंची धाड

Nana Patole : गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा - नाना पटोले

Pune Porsche Accident: 'पाहिजे तेवढे पैसे घ्या पण, मारू नका...', पोर्श अपघातातील आरोपी काय ओरडत होता? वाचा, प्रत्यक्षदर्शीच्या शब्दांत

Sakal Podcast : वेळेपूर्वीच केरळमध्ये धडकणार मान्सून ते अमेरिका लवकरच होणार क्रिकेटमय

‘एसडीआरएफ’ पथकांची संख्या वाढविणार; मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय

SCROLL FOR NEXT