file photo 
नांदेड

लॉकडाउन: लाचेचा मोह सुटेना, नांदेड परिक्षेत्रात १४ सापळे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभार हे शासनाचे धोरण असून त्या धोरणाची अंमलबदजावणी करणे हेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे. शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित असते. मात्र काही लोकसेवक या सेवेसाठी लाच मागतात. अशा लाचखोर लोकसेवकांवर या विभागाचे लक्ष असते. लॉकडाउनच्या काळात नांदेड परिक्षेत्रांतर्गत १४ सापळे लावून २० भ्रष्टाचारी लोकसेवकांवर कारवाई केली आहे. यात नांदेड जिल्ह्यात सहा सापळ्‍यात नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रशासनातील लालफितीचा कारभार अनेकांना भंडावून सोडतो. सरकारी काम आणि दोन महिणे थांब ही अवस्था सध्या कार्यरत असलेल्या काही बाबूंच्या बाबतीत पहावयास मिळते. कुठल्याच फाईलीवर वजन ( पैसा) ठेवल्याशिवाय सर्वसामान्यांचे काम होत नाही. हा सर्वांचाच अनुभव आहे. एखाद्या व्यक्तीला शासकिय योजनेचा लाभ झाला तर त्याला सरकारी बाबूंच्या मागेपुढे धावावे लागते. किंवा त्याला आर्थीक आमिष दाखवून वेळप्रसंगी कर्ज काढून आपल्या कामासाठी संबंधीत अधिकारी किंवा कर्मचारी यांना लाच द्यावी लागते. हे निर्लज्ज लोकसेवक टेबलाखालून लाच घेणे आपले कर्तव्य समजतात. अशा लोकसेवकांवर लक्ष ठेवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. 

लाच देणे व घेणे गुन्हा

लोकसेवकांनी लाच घेऊ नये व नागरिकांनी लाच देऊ नये असे फलक शासकिय कार्यालयात झळकतात. मात्र कुठलेच काम लाच दिल्याशिवाय होत नाही. लाचखोरीवर नियंत्रण आणण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी आठवडी बाजारात, शासकिय कार्यालयात माहिती पत्रक वाटप करतात. नागरिकांना आवाहन करतात की, कुठल्याही शासकिय कामासाठी कोणी लाच मागितली तर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात संपर्क साधावे असे आवाहन करण्यात येते. 

परिक्षेत्रात १४ सापळ्यात २० लोकसेवक 

नांदेड परिक्षेत्रात नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे. या परिक्षेत्रांतर्गत लॉकडाउनच्या काळात तब्बल १४ सापळे यशस्वी करण्यात आले. यात २० जणांवर लाचेचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात नांदेडमध्ये सहा कारवायात नऊ लोकसेवक, लातूरमध्ये चार सापळ्यात सहा, परभणीमध्ये एक सापळा एक लोकसेवक आणि हिंगोलीमध्ये तिन कारवाईत चार लोकसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ्यांची रचना

या सापळ्यांसाठी पोलिस अधिक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे, माणिक बेद्रे, हनुमंत गायकवाड, शामसुंदर टाक, भरत हुंबे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT