घाबरु नका, मानसिकता मजबुत ठेवा- डॉ. अब्दुल रहेमान

प्रल्हाद कांबळे
Thursday, 11 June 2020

मानसिकता व आरोग्याबद्दलची माहिती असल्याने कोरोनावर मात करता आली. असे मत कोरोनातून बरे झालेले डॉ. अब्दुल रहेमान यांनी सांगितले. l

नांदेड : जवळच्या रुग्णाला तपासत असताना तो रुग्ण पॉझिटिव्ह होता. हे काही दिवसांनी समजल्यानंतर मला व माझ्यापासून माझ्या परिवाराला कोरोनाची बाधा झाली. आम्ही सर्वजण कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेतला. मात्र मानसिकता व आरोग्याबद्दलची माहिती असल्याने कोरोनावर मात करता आली. असे मत कोरोनातून बरे झालेले डॉ. अब्दुल रहेमान यांनी सांगितले. l

या रोगापासून घाबरुन जाण्याची भिती नाही. मात्र त्यासाठी काही दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच वैद्यकीय पद्धतीने मिळणाऱ्या उपचारांना प्रतिसाद देण्यासाठी स्वतःच्या मानसिकतेला मजबूत केल्यास कोरोनाला हरविण्यात जास्त वेळ लागणार नाही. देगलूर नाका परिसरातील डॉक्टर शेख अब्दुल रहमान शेख हसन यांनी आपला क्वारंटाईन काळ हसत खेळत घालवला. अहवाल पॉझिटिव्ह आले त्यानंतर तर त्यांची जबाबदारी वाढली. कारण ते स्वतः डॉक्टर होते आणि इतर रुग्णांना कोरोना आजाराची माहितीच नव्हती. त्यामुळे त्यांचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी इतर रुग्णांबाबत समुपदेशन करण्याची जबाबदारी दिली. आपल्या कुटुंबातील लहान बालके घेऊन बाधा झालेल्या डॉ. अब्दुल रहमान यांनी भरपूर मेहनत घेतली. त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत घेतली.

हेही वाचा -  विद्यापीठात ‘या’ ऑनलाइन कोर्सेसची नोंदणी सुरू
 
रोग प्रतिकार शक्ती ही वाढविणे 

अब्दुल रहमान यांच्या सांगण्याप्रमाणे विलगीकरण याचा कालावधी दहा दिवस. या दहा दिवसात दररोज तपासणी होत असते. ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसली त्यांना हायड्रोक्लोरिक्वीन या गोळ्या दिल्या जात होत्या. आणि ज्यांना ताप, उलटी असे प्रकार आहेत त्यांना त्या पद्धतीचे औषध दिले जात होते. अत्यंत कमी स्वरूपाच्या लक्षणासाठी मल्टी विटामिन गोळ्या दिल्या जात होत्या. आपल्यामधील रोग प्रतिकार शक्ती ही वाढविणे आणि त्याला जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण रोगाविषयी जास्त माहिती नसल्यामुळे तेथे येणारा रोगी घाबरतो आणि रोगापेक्षा जास्त त्या घाबरण्याचा परिणाम त्याच्या शरीरावर जास्त दिसतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

आजारापासून घाबरणे ऐवजी आमची मानसिकता मजबूत 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी आणि इतर डॉक्टरांनी मिळून आम्हाला जास्तीत जास्त ऑक्सिजन प्राप्त करा. त्यामुळे तुमच्यातील कोरोना लक्षणे लवकर कमी होतील असा संदेश दिला. माझ्या सोबत असणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे विलपॉवर वाढविण्यासाठी मी तर मदत करत होतोच. सोबतच केअर सेंटरमध्ये अनेक मानसिक उपचार करणारे डॉक्टर येत होते. आणि ते सुद्धा रुग्णांना आणि मला आजारापासून घाबरण्याऐवजी आमची मानसिकता मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत होते.

येेथे क्लिक करा - सावधान....नांदेडमध्ये कोरोना पसरतोय...काळजी घ्या...

कोरोनाचा पराजय नक्कीच करु 

माझ्यासोबत असलेल्या जवळपास आठ बालकांसोबत मला दिवस काढता आले. त्यांच्यासोबत खेळता बागडता आले. त्या बालकांमध्ये माझेसुद्धा दोन बालकं होती. आम्ही त्यातून पूर्ण बरे झालो. शेवटी अब्दुल रहेमान यांनी सांगितले की, जनतेने कोरोना विषाणूपासून न घाबरता आपल्या मानसिकतेत बदल करून रोग प्रतिकार शक्ती वाढविली पाहिजे. तरच आपण कोरोनाचा पराजय नक्कीच करु असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't be afraid, keep the mentality strong Dr. Abdul Rahman nanded news