Nanded Bharat Jodo Yatra
Nanded Bharat Jodo Yatra 
नांदेड

Nanded : ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी व्हावे; अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असून या यात्रेला देशभरात खुप मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा नांदेड जिल्हात येत असून या यात्रेत उस्फूर्तपणे सहभागी व्हावे. जिल्ह्यातील नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेण्यासाठी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन करावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी केले.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिर अशी भारत जोडो यात्रा काढली असून ही यात्रा नांदेड जिल्ह्यात येत आहे. ही यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.

या यात्रेची तयारी करण्यासाठी शहरातील राजहंस मंगल कार्यालयात हदगाव, हिमायतनगर, भोकर, अर्धापूर, मुदखेड, किनवट या तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार अमर राजूरकर, गणपतराव तिडके, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, बी.आर. कदम, नरेंद्र चव्हाण, संजय देशमुख लहानकर, बाळासाहेब देशमुख, पप्पु पाटील कोंढेकर, मारोती शंखतीर्थकर, रोहीदास जाधव, काँग्रेस तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे, आनंद भंडारे, उद्धवराव पाटील, विकास देवसरकर, जगदीश भोसीकर, संजय राठोड, सुर्यकांत रेड्डी, राजू शेटे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसबीर खतीब, माधव कदम, दत्तु देशमुख, अमोल डोंगरे, राजू बारसे आदी उपस्थित होते.

या बैठकीत यात्रेनिमित्त नियोजन, केलेल्या कामांचा आढावा, पुर्णवेळ सहभागी होणारे कार्यकर्ते, निवास व्यवस्था आदी संबंधित आढावा घेऊन सुचना करण्यात आल्या. यात्रेनिमित्त केलेल्या नियोजनांची माहिती तालुकाध्यक्षांनी दिली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, मुक्काम, आरोग्याची काळजी, आदी संबंधित माहिती दिली. यात्रेचे भव्यदिव्य स्वागत करण्यासाठी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ मदने यांनी केले तर आभार राजु शेटे यांनी मानले. या वेळी डॉ. विशाल लंगडे, पंडित लंगडे, सोनाजी सरोदे, प्रवीण देशमुख, भगवान तिडके, चंद्रमुणी लोणे, संजय लोणे, नामदेव सरोदे, सलीम कुरेशी, बाळू माटे, गाजी काजी, गोपाल पंडित, नासेर खान पठाण, व्यंकटी राऊत, उमेश सरोदे, पंडित शेटे, व्यंकटी साखरे, वसंतराव कपाटे, दिलीप डाढाळे, नवनाथ कपाटे, राजू कल्याणकर, सुभाषराव कल्याणकर, साहेबराव लोखंडे, पिंटू स्वामी, बळवंत इंगोले, ईश्वर पाटील इंगोले, अनिल इंगोले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT