Mahila Raj four Panchayats, Nanded News, Nanded gram panchayat election result News
Mahila Raj four Panchayats, Nanded News, Nanded gram panchayat election result News sakal
नांदेड

Nanded News: चार ग्रामपंचायतींवर महिलाराज

सकाळ वृत्तसेवा

आखाडा बाळापूर : परिसरातील येलकी, कृष्णापूर, पिंपरी बुद्रूक, कांडली येथील ग्रामपंचायतींवर प्रथमच महिला सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. नुकत्याच पार पाडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक गावांमध्ये झालेल्या निवडणुकीत नवीन चेहरे उदयास आलेले आहे.(Nanded News updates)

यंदा प्रथमच जनतेतून सरपंचाची निवड करण्यात आली आहे. यामुळे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेले नवीन नेतृत्व सरपंचपदी विराजमान झाले आहे. त्यामध्ये येलकी येथे महिला सरपंचपदी सुनंदा अजय पांडे यांची निवड झाली. तर, सदस्यांमध्ये अजय पतंगे, बबन येडतकर, शिलाबाई गंगाधर नरवाडे, संतोष पतंगे, संगीता शिवाजी सोळंके, खतीफा शफायत बेगम पठाण, बुरखा बी अब्बास खान, ताई निवृत्ती वाघमारे, जावेद खान खालिक मियाँ आदींचा समावेश आहे. पिंपरी बुद्रूक येथे सरपंचपदी गया विजय खिल्लारे यांची वर्णी लागली आहे. सदस्य म्हणून प्रशांत जाधव, संदीप जाधव, भाग्यश्री जाधव, सचिन जाधव, वेणूबाई रमेश कदम, बेबीबाई भास्कर मुळे,

संगीता दत्ता जोगदंड यांचा समावेश आहे. यात सर्वच्या सर्व नवीन चेहरे उदयास आलेले आहेत. कृष्णापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये अनिता पामराव माहोरे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. तर, सदस्य म्हणून सचिन बहीवाळ, उषाबाई चंद्रमुनी काशीदे, चंद्रकलाबाई दादाराव नेवल, दीपक नरवाडे आदींचा समावेश आहे. यामध्येही बहुतांश चेहरे नवीनच आहेत. तसेच कांडली येथे सरपंचपदी रेखा सदाशिव सावंत यांची निवड झाली आहे. एकंदरीत चार ग्रामपंचायतींवर महिला सरपंचपदी विराजमान झाल्याने आता चारही ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती आलेला आहे.

विकास कामांमध्ये लक्ष द्यावे

प्रथमच सरपंचपदी निवड झालेल्या महिलांनी आता ग्रामपंचायतीचा कारभार स्वतः करावा. फक्त सह्यापुरते मर्यादित न राहता स्वतः विकास कामांमध्ये लक्ष द्यावे. महिला सरपंचाच्या नावावर घरातील पुरुष मंडळींनीही ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT