Nanded Waghala Municipal Corporation
Nanded Waghala Municipal Corporation sakal
नांदेड

नांदेड : आरक्षण सोडत स्थगित झाल्याने इच्छुकांचा हिरमोड

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. पाच) काढण्यात येणारी आरक्षण सोडत स्थगित झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. प्रशासनाने देखील गेल्या तीन दिवसापासून याबाबतची तयारी केली होती. मात्र, शासनाच्या आदेशानुसार ही सोडत स्थगित करण्यात आली आहे.

राज्य शासनाने मुंबई महापालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणारी नऊ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य १४ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. हे आदेश गुरूवारी रात्री काढण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करावी लागली.

नांदेड वाघाळा महापालिकेची मुदत आॅक्टोंबरमध्ये संपत असल्यामुळे निवडणुकीची प्रशासकीय तयारी राज्य निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार महापालिका प्रशासनाने सुरू केली होती. मात्र, आता आरक्षण सोडत स्थगित करण्यात आल्यामुळे अऩेक इच्छुकांचा हिरमोड झाला. अनेकांना या सोडतीची उत्कंठा लागली होती. कारण आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट होणार होते आणि त्यानुसार इच्छुकांना पुढील निर्णय घेणे सोपे जाणार होते. मात्र, त्यास स्थगिती मिळाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. त्याचबरोबर महापालिका प्रशासनाने देखील गेल्या तीन दिवसापासून आरक्षण सोडतीची रंगीत तालीम केली होती ती देखील वाया गेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT